Vaishali Shinde Passed Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Vaishali Shinde Passed Away: बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

Vaishali Shinde Death: गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

Priya More

Vaishali Shinde News:

आंबेडकरी चळवळीतील (Ambedkari Chalval) ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे (veteran singer vaishali) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज हरपल्याचे बोलले जात आहे. वैशाली शिंदे यांचे ६२व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शिंदे या गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होत्या. त्यांच्या पायाला देखील गँगरीन झाले होते. उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अशामध्येत गुरूवारी संध्याकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज घाटकोपरच्या भटवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वैशाली शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्या दमदार गाण्यांच्या माध्यमातून वैशाली शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीला बळ दिले होते. वैशाली शिंदे यांना त्यांच्या आई-वडिलांकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांचे वडील रामचंद्र आणि आई सरुबाई क्षीरसागर हे दोघंही भीमगीत गायचे. त्यांच्यापासूनच वैशाली गाणं शिकल्या होत्या. आई-वडिलांनी दिलेला वारसा सांभाळत वैशाली भीमगीत आणि बुद्धांची गाणी गात होत्या.

सोलापूरवरून आई-वडिलांसोबत वैशाली शिंदे या पुण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी विष्णू शिंदे यांच्यासोबत लग्न केले. वैशाली शिंदे यांचे लग्नापूर्वीचे नाव दया क्षीरसागर होते. पण लग्नानंतर त्यांचे नाव वैशाली झाले. विष्णू शिंदेंसोबत लग्न केल्यानंतर त्या पुण्यावरून मुंबईत आल्या. तेव्हापासून त्या मुंबईमध्येच राहत होत्या. वैशाली शिंदे यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वस्तरावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसाचा पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

तुम्ही रेल्वे वाले, आम्ही लाथ मारून जागा दाखवू; होमगार्डनं धावत्या लोकलमध्येच गार्डच्या मारली लाथ, VIDEO व्हायरल

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

SCROLL FOR NEXT