Dr. Vilas Ujawane Passes Away Saam Tv News
मनोरंजन बातम्या

'चार दिवस सासूचे', 'दामिनी' सिरीयलच्या माध्यमातून आपली छाप, प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन

Vilas Ujawane Passed Away : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालंय. त्यांच्या जाण्याने मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे.

Prashant Patil

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालंय. त्यांच्या जाण्याने मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना, मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'चार दिवस सासूचे', 'दामिनी', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आपली छाप सोडली होती. त्यांच्या सहजसुंदर अभिनय शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते. सकारात्मक भूमिकांसह त्यांच्या खलनायकी भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. डॉ. उजवणे यांच्या जाण्याने मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराचा सामना करत होते. काही वर्षांपूर्वी डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्याच्या त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. या आजारपणाशी झुंज देताना डॉ. उजवणे यांना हृदयविकाराचा त्रासदेखील जाणवू लागला होता. या आजारपणात त्यांना आर्थिक अडचणींचादेखील सामना करावा लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने २०२२ साली त्यांच्या एका जवळच्या मित्राने डॉ. उजवणे यांना आर्थिक मदत करण्यासाठी सोशल मीडिया पोस्टद्वारे आवाहन केलं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

SCROLL FOR NEXT