Mumbai Diaries Season 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai Diaries Season 2 :२६/११ ला बाँम्बे हॉस्पिटमध्ये नक्की काय घडलं? 'मुंबई डायरीज 2'मधून मृण्मयी देशपांडे सांगणार तिचा अनुभव

Mrunmayee Deshpande : मृण्मयी पुन्हा एकदा नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mrunmayee Deshpande New Webseries

मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. मृण्मयीने मराठी इंडस्ट्रीत खूप नावलौकिक कमावला आहे. त्याचबरोबर मृण्मयी बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडत आहे. मृण्मयीने नुकतीच तिच्या आगामी वेबसीरीज 'मुंबई डायरीज 2' संबंधित पोस्ट शेअर केली आहे.

मृण्मयी देशपांडेने याआधीही 'मुंबई डायरीज'च्या पहिल्या सीझनमध्ये काम केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या भागात मृण्मयी पुन्हा एकदा नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२६/११ च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित असलेली ही वेबसीरीज आहे. या हल्ल्याच्या वेळी घडलेला संपूर्ण अनुभव हुबेहुब दाखवण्याचा प्रयत्न या वेबसीरीजमधून केला आहे. त्यावेळी सर्वात पहिला हल्ला हा हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्यावेळी तेथील पेशंट, डॉक्टर यांनी कशी झूंज दिली याचा थरारक अनुभव प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. आता याच वेबसीरीजचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मृण्मयी देशपांडेने याविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. वेबसीरीजमधील तिची भूमिका असलेले पोस्टर शेअर केले आहे. 'बॉम्बे जनरल हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांच्या आयुष्यातील एक नवीन दिवस नवीन वादळ घेऊन येत आहोत'. असं कॅप्शन दिले आहे.

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने या वेबसीरीजमध्ये एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. या वेबसीरीजचा पुढचा भाग लवकरच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरीजमध्ये मृण्मयी देशपांडेबरोबर मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, सत्याजीत दुबे आणि नताशा भारद्वाज अशी स्टारकास्ट दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Maharashtra Live News Update: वीज पडून 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू,वर्ध्यातील घटना

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT