Ambani Family Dance 'Deewangi Deewangi' Song Instagram
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Merchant Wedding : अंबानी कुटुंबीयांनी संगीत सोहळ्यात केला भन्नाट डान्स; 'दिवानगी दिवानगी' गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, पाहा VIDEO

Ambani Family Dance 'Deewangi Deewangi' Song : राधिका- अनंतच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. नुकताच संगीत समारंभ पार पडला. यावेळी अंबानी फॅमिलीने जबरदस्त डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले. सध्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ३ जुलैपासून राधिका- अनंतच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. 'मामेरू'पासून त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली. नुकताच संगीत समारंभ पार पडला. या इव्हेंटसाठी अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. यावेळी हॉलिवूडसह काही बॉलिवूड कलाकारांनीही उपस्थितांना आपल्या गाण्यावर ठेका धारायला भाग पाडलं. अशातच सध्या सोशल मीडियावर अंबानी फॅमिलीच्या डान्सची जोरदार चर्चा होत आहे. अंबानी फॅमिलीने शाहरुख खानच्या 'दिवानगी दिवानगी' गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे.

गेल्या काही तासांपूर्वी 'विरल भयानी' या पापाराझी इन्स्टा चॅनलने अंबानी कुटुंबीयांच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, नीता अंबानी, मुकेश अंबानी, ईशा अंबानी आणि तिचे पती, आकाश अंबानी, त्याची पत्नी श्लोका मेहता, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट असे सर्वजण या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सध्या सर्वांच्याच गाण्याची हूकस्टेप्सची चर्चा जोरदार होत आहे. व्हिडिओमध्ये, नीता अंबानी यांनी परफॉर्मन्स दरम्यान खास भरतनाट्यम स्टेप करत एन्ट्री मारली. यावेळी अंबानी फॅमिलीने मनसोक्त डान्स स्टेप करत स्टेजवर एन्ट्री मारली.

डान्ससोबतच अंबानी फॅमिलीच्या लूकचीही जोरदार चर्चा होत आहे. सर्वांनीच एकापेक्षा एक जबरदस्त लूक करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यावेळी अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या रॅपवर उपस्थितांनी यावेळी जबरदस्त ठेका धरला होता. यावेळी सलमान खान, विकी कौशल, दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, एम.एस.धोनी, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अर्पिता खान, आयुष शर्मा, विद्या बालन, अमृता फडणवीस यांच्यासह अवघ बॉलिवूड यावेळी संगीत सोहळ्याला उपस्थित होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत- राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. १२ जुलैला भव्य दिव्य लग्न, १३ जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा तर १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

SCROLL FOR NEXT