Mrunmayee Deshpande Video
Mrunmayee Deshpande Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mrunmayee Deshpande Video: सासुरवाशीण गौतमीला जळवण्यासाठी मृण्मयीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाली, टुक टुक गौतू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखले जाते. मृण्मयी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. मृण्मयी नेहमी बहिण गौतमीसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा व्हिडिओमध्ये मृण्मयी गौतमीला त्रास देताना दिसत असते. बहिणींमधील ही केमिस्ट्री चाहत्यांना मात्र नेहमीच आवडत असते. मृण्मयीने पुन्हा एकदा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मृण्मयी व्हिडिओमध्ये म्हणतेय की, 'खूप जास्त दमल्यावर, खूप काम केल्यावर, प्रमोशन्ससाठी मुंबई पुणे, मुंबई कोल्हापूर, सांगली अशा अनेक ठिकाणी फिरल्यानंतर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीची गरज असते तर तो हा उपाय'. असं म्हणते. यानंतर मृ्ण्मयीची आई तिला केसांना तेल लावताना दिसत आहे. या व्हिडिओला मृण्मयीने 'लाड = आई = लाड, टूक टूक गौतू', असं कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओमध्ये मृण्मयी मात्र आईकडून डोक्याला तेल लावून घेताना खूपच आनंदी दिसत आहे. या व्हिडिओवर गौतमीला टॅग करत तिला जळवण्याचा प्रयत्न करत आहे. मृण्मयीच्या या व्हिडिओवर गौतमीने कमेंट केली आहे. गौतमीने नाक मुरडल्याचा इमोजी टाकत आपली नाराजी व्यक्त केली आहे. परंतु बहिणींच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मृण्मयीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, मृण्मयी लवकरच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात ती ललिताबाई फडके यांची भूमिका साकरणार आहे.

Edited By-Siddhi Hande

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

Health Tips: नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके का येतात?

SCROLL FOR NEXT