Post Shared Gautami Deshpande For Mrunmayee Deshpande Instagram
मनोरंजन बातम्या

Gautami Deshpande Social Media Post: काय सांगता..! गौतमी देशपांडेने बहिणीला दिली गाढवाची उपमा, नंतर मृण्मयीने असं उत्तर दिलं की…

Gautami Deshpande Instagram Post: नुकतंच गौतमीने सोशल मीडियावर गौरीसाठी खास एक मीम शेअर केला आहे. तो पाहून नक्कीच तुमचे हसू आवरणार नाही, हे नक्की....

Chetan Bodke

Post Shared Gautami Deshpande For Mrunmayee Deshpande: मराठी सिनेसृष्टीत क्वचितच भाऊ- बहीण एकत्र काम करतात असे खूप कमी आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशीच एक जोडी म्हणजे गौरी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे. यांचे आपण अनेकदा सोशल मीडियावर भांडणं झालेली पहिली आहेत. नुकतंच गौतमीने सोशल मीडियावर गौरीसाठी खास एक मीम शेअर केला आहे. तो पाहून नक्कीच तुमचे हसू आवरणार नाही, हे नक्की....

दोघीही बहिणींनी मराठी टेलिव्हिजनसृष्टीत स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. आपल्या कामांमुळे, स्वभावामुळे यांची जोडी अधिकच लोकप्रिय आहे. नात्यातील गोडवा, एकमेकांमधील मैत्री आणि त्यांच्यातील बाँडींग चाहत्यांचे मन वेधत आहे. गौतमीने तिच्या पर्सनल अकाऊंटवरून गाढवाचा एक फोटो स्टोरीवर शेअर केला होता. शेअर केलेल्या स्टोरीमध्ये गौतमीने तिच्या ताईला, म्हणजेच मृण्मयीला टॅग केलं. पण यावर मृण्मयीने गौतमीला जे उत्तर दिलं ते पाहून गौतमीने केलेली ही मस्करी तिच्यावरच उलटलीय.

Gautami Deshpande Post

गौतमी आणि मृण्मयी जितक्या त्यांच्या खासगी आयुष्यात एकमेकींना पाठिंबा देतात, त्याहून जास्त त्या एकमेकींसोबत भांडताना दिसतात. गौतमी आणि मृण्मयी या दोघी नेहमीच सोशल मीडियावरून एकमेकींसोबत मस्करी करत असतात.

नुकतंच गौतमीने बहिण मृण्मयीसाठी एक मीम शेअर केली आहे. त्या मीममध्ये एक युनिकॉनचा फोटो आहे आणि एक गाढवाचा फोटो आहे. युनिकॉनच्या फोटोवर लिहिलंय की, तुमच्या बहिणीला वाटतं की ती अशी आहे. तर गाढवाच्या फोटोवर लिहिलंय की, पण ती अशी असते. अशी मस्करी आता गौतमीने मृण्मयीसोबत केली आहे. त्या फोटोवर गौतमीने मृण्मयीला टॅग केलं आहे.

Mrunmayee Deshpande Post

गौतमीच्या स्टोरीवर मृण्मयीने जबरदस्त उत्तर दिले. त्यावर ती म्हणते, “पोस्टची वेळ चुकली गौत्या… आत्ताच UK मधून आले आहे आणि तुझ्यासाठी खूप काही आणलं होतं. पण आता सगळं विसर बाळा.” असं उत्तर देत गौतमीची बोलतीच बंद केली.

बहिणीसोबत केलेली गंमत जेव्हा आपल्या अंगलट आली, हे कळल्यावर गौतमीने अखेर नमतं घेतलं. गौतमी तिला उत्तर देत म्हणते, “मी स्वतःबद्दल बोलत होते गं… मी अशी दिसते… तू माझ्यासाठी गिफ्ट आणलीस त्याबद्दल धन्यवाद.” या दोघींचं ही स्टोरी वॉर पाहून चाहत्यांचं देखील हसू आवरलं नाही.

Gautami Deshpande Post In Say Soryy

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT