Mrunmayee Deshpande  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची भन्नाट लव्ह स्टोरी; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचा टीझर पाहिला का?

Manache Shlok Teaser : मृण्मयी देशपांडे 'मना'चे श्लोक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Shreya Maskar

'मना'चे श्लोक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

'मना'चे श्लोक' चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे मुख्य भूमिकेत आहेत.

'मना'चे श्लोक' ही एक प्रेमकथा आहे.

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayee Deshpande) 'मना'चे श्लोक' (Manache Shlok Teaser ) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मना'चे श्लोक' चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. तेव्हापासून प्रेक्षक 'मना'चे श्लोक' चित्रपटाची वाट पाहत आहे. टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे त्याबद्दलचे विचार दाखवले आहेत. मनवा आणि श्लोक ही दोन पात्रे चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरत आहेत. मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे. तर श्लोक हा शांत आणि समंजस मुलगा आहे. त्यांच्यातील संवाद चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहेत. हे दोन भिन्न स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत काय घडते, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

'मना'चे श्लोक' स्टारकास्ट

'मना'चे श्लोक' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकार आहेत. मृण्मयी देशपांडेच्या अभिनयाने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत.

'मना'चे श्लोक' रिलीज डेट?

'मना'चे श्लोक' हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे हिने केले आहे. तसेच श्रेयश जाधव आणि संजय दावरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 'मना'चे श्लोक'बद्दल मृण्मयी देशपांडे म्हणते, "'मना'चे श्लोक' चित्रपट माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. मनवा आणि श्लोकचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच आवडेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT