Prajakta Mali : 'बुम बुम बोंबला...' प्राजक्ता माळी अन् मृण्मयी देशपांडेचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Prajakta-Mrunmayee : प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडे यांनी 'बुम बुम बोंबला' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ प्राजक्ताने हटके कॅप्शन देऊन सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Prajakta-Mrunmayee
Prajakta MaliSAAM TV
Published On

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील कलाकारांचा 'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) , प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाची गाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'बुम बुम बोंबला' हे गाणे तुफान हिट झाले आहे. याच गाण्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee Deshpande) जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मृण्मयी देशपांडे आणि प्राजक्ता माळी 'बुम बुम बोंबला' हुकस्टेप करताना दिसत आहे.

प्राजक्ताने या व्हिडीओला एक मजेशीर कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "फिल्म रिलीज तोंडावर असताना... भेटेल त्या प्रत्येकाकडून #hookstep करवून घेणं #mandatory असतं ना…मग गाणं #western आणि #costume नऊवार का असेना…" या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची नऊवारी तर मृण्मयीने केशरी रंगाची नऊवारी नेसली आहे.

डान्स व्हिडीओमध्ये दोघी मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नम्रता संभेरावचा कॅमिओ देखील आहे.

Prajakta-Mrunmayee
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला नाशिकमध्ये विरोध, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com