Dharmaveer Chitrasrusti Was Announced By MP Shrikant Shinden In Thane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंची घोषणा; ठाण्यात उभारणार ‘धर्मवीर चित्रपटसृष्टी’...

खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रेक्षकांसोबत ‘धर्मवीर’ बनवतानाचा अनुभव शेअर केला. चित्रपट बनवताना अनेक महत्वाचे अनुभव आले, त्या सर्व अनुभवांचा मेळ घालत ठाण्यामध्ये ‘धर्मवीर चित्रपटसृष्टी’ उभी करणार असल्याची ग्वाही दिली.

Chetan Bodke

Dharmaveer Chitrasrusti Was Announced By Shrikant Shinde: प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. सोबतच प्रसाद ओकच्या भूमिकेने धर्मवीर आनंद दिघेंच्या पात्राला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सिक्वेलची देखील चर्चा सुरू झाली होती. पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली होती.

‘सकाळ प्रीमियर नाट्यसेवा सन्मान’ पुरस्काराला यावेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक संजय वाघुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात १२ एप्रिल बुधवारी दिमाखात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अवघे तारांगण त्यासाठी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अवतरले होते. (Latest Marathi News)

यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रेक्षकांसोबत ‘धर्मवीर’ बनवतानाचा अनुभव शेअर केला. यावेळी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना चित्रपट बनवताना अनेक महत्वाचे अनुभव आले, त्या सर्व अनुभवांचा मेळ घालत ठाण्यामध्ये ‘धर्मवीर चित्रपटसृष्टी’ उभी करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “ ‘धर्मवीर’ चित्रपट बनवताना अनेक अनुभव आले. त्या अनुभवांची शिदोरी घेऊन ठाण्यामध्ये ‘धर्मवीर चित्रपटसृष्टी’ उभी करणार. यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. (Marathi TV Serial)

‘प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. राजदत्त यांनी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले. अलीकडे असे चित्रपट बघायला मिळत नाहीत. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत दर्जेदार चित्रपटही पोहोचत नाहीत. अशा कलाकृती ‘चित्रपट महोत्सवा’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार, असे ते म्हणाले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT