Harish Dudhade got married  Instagram @harishdudhadeofficial
मनोरंजन बातम्या

Harish Dudhade: 'पावनखिंड' फेम अभिनेत्याची नवी इनिंग सुरू, हरिश दुधाडे अडकला लग्नबंधनात

पावनखिंड चित्रपटातील अभिनेता हरिश दुधाडे हा सुद्धा लग्नबंधनात अडकला आहे.

Pooja Dange

Actor Harish Dudhade: मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हे लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. पावनखिंड चित्रपटातील अभिनेता हरिश दुधाडे हा सुद्धा लग्नबंधनात अडकला आहे. आनंद मोहन याने शेअर केलेल्या पोस्टमुळे हरिशच्या लग्नाची बातमी त्याच्या चाहत्यांना कळली.

हरिश दुधाडे सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकतेच हरिशने त्याच्या लग्नाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. हरिशने फोटो शेअर करताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे. 'आणि नवीन प्रवासाला सुरूवात' असे कॅप्शन हरिशने त्याच्या पोस्टला दिले आहे. तसेच त्याने ही पोस्ट त्यांच्या पत्नीला टॅग सुद्धा केली आहे. समृद्धी निकम असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. (Actor)

हरिशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पत्नीसोबत सुंदर पोज दिली आहे. हे नवे जोडपे या फोटोंमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. हरिशने सदरा, उपरणं आणि फेटा असा लूक केला आहे. तर त्याची पत्नी समृद्धी ही नऊवारी साडी नेसली आहे. तसे तिने अगदी मोजकेच दागिने घातले आहे. (Social Media)

हरिशने शाळेपासूनच अभिनयाची सुरूवात केली होती. आज जवळपास १०-१२ वर्ष तो अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'पावन खिंड चित्रपटातील 'बहिर्जी नाईक' ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. सध्या हरीश रत्नाकर मतकरी लिखित 'काळी राणी' नाटकामध्ये व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT