Mouni Roy SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mouni Roy : दिशा पटानीमुळे मौनी रॉयचा Divorce झाला? घटस्फोटावर सूरज पहिल्यांदाच बोलला, वाचा नेमकं काय म्हणाला?

Mouni Roy Ex Husband Suraj Nambiar Rection On Divorce : नुकताच टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयचा घटस्फोट झाला आहे. आता मौनी रॉयचा एक्स पती सूरज नांबियारने मोठा खुलासा केला आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर सूरज नांबियार पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मौनी रॉय टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयचा घटस्फोट झाला. मौनी आणि सूरज नांबियार यांचा तब्बल ४ वर्षांचा संसार मोडला. घटस्फोटाची माहिती दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांनी दिली. घटस्फोटानंतर दोघांविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या. मौनी रॉयने पोटगी घेतल्याचे म्हटले गेले. तसेच यांचे नाते एका तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटले असेही बोले गेले.

दिशा पटानीमुळे मौनीचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. आता या सर्व गोष्टींवर मौनी रॉयचा एक्स नवरा सूरज नांबियारने पोस्ट शेअर करून अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मोठा खुलासा केला आहे.

'सूरज नांबियार'ची पोस्ट

"मौनीने माझ्याकडून कोणत्याही पोटगी घेतली नाही. आमच्यात कोणतेही वाद नाही. तसेच, आमचे नाते तुटण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नाही. मौनी आणि मी आम्ही दोघांनीही परस्पर आदर राखून आणि एकमेकांच्या हिताचा पूर्ण विचार करूनच वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हेच एकमेव सत्य आहे. याव्यतिरिक्त प्रसिद्ध होणाऱ्या इतर सर्व बातम्या केवळ कल्पित कथा आहेत. तसेच दोन व्यक्तींची बदनामी करण्याचा हा एक हेतुपुरस्सर प्रयत्न आहे.या प्रकरणात इतर लोकांना ओढणे ही अजिबात चांगली गोष्ट नाही.या संपूर्ण काळात मौनी आणि मी अत्यंत सन्मानाने आणि संयमाने वागलो आहोत. धन्यवाद..."

मौनी रॉय आणि दिशा पटानी हे चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेक कार्यक्रमांना मौनी रॉय, दिशा पटानी आणि सूरज नांबियार एकत्र स्पॉट झाले. 'सूरज नांबियार'ने म्हटल्यानुसार सूरज आणि मौनीच्या घटस्फोट घेण्यामागे कोणीही तिसरी व्यक्त नाही. तसेच कोणतीही पोटगी प्रकरण नाही. दोघेही आता आपापल्या आयुष्यात शांतपणे जगत आहेत.

suraj Nambiar

जानेवारी २०२२ मध्ये मौनी रॉय आणि सूरज नांबियार लग्न बंधनात अडकले. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यामध्ये शाही थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. मौनी रॉयही टिव्ही आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर मौनीचे 33.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. मौनी रॉयला 'नागिन' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिने रिअलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'ब्रह्मास्त्र', 'वेले', 'ब्लॅकआउट', 'लव्ह सेक्स और धोखा 2', 'गोल्ड' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT