War 2 VS Coolie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Coolie VS War 2: सोमवारी 'कुली'ने मारली बाजी, केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री; जाणून घ्या 'वॉर २'चं कलेक्शन

Coolie VS War 2 Box Office Report: हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरचा 'वॉर २' आणि रजनीकांतचा 'कुली' यासह अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. सोमवारी कोणी किती कमाई केली ते जाणून घेऊया

Shruti Vilas Kadam

Coolie VS War 2 Box Office Report: रजनीकांत स्टारर 'कुली' हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. काल पहिल्या सोमवारी या चित्रपटाने चांगल कलेक्शन केल. हा चित्रपट 'वॉर २' पेक्षा चांगला होता. याशिवाय 'महावतार नरसिंह' आणि 'सैयारा' सारखे चित्रपटही थिएटरमध्ये सुरू आहेत. सोमवारी या चित्रपटांनी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊया?

'वॉर'

अयान मुखर्जीचा दिग्दर्शित आणि हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत 'वॉर २' १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली. परंतु, सोमवारी त्याच्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. चौथ्या दिवशी, रविवारी, चित्रपटाने सुमारे ३२.१५ कोटी रुपये कलेक्शन केले होते. दुसरीकडे, काल सोमवारी त्याची कमाई ८.४ कोटी रुपये होती. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १८३.१७ कोटी रुपये आहे.

'कुली'

'वॉर २' सोबतच रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपटही १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच कमाईच्या बाबतीत हा चित्रपट 'वॉर २' ला मागे टाकत आहे. सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट सोमवारी कमाईच्या बाबतीतही पुढे होता. रविवारी कुलीने ३५.२५ कोटी रुपये कमावले. तर सोमवारी या चित्रपटाने १२.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन २०६.६५ कोटी रुपये झालं आहे.

'महावतार नरसिंह'

या चित्रपटाची जादू अजूनही अबाधित आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे. रविवारी सुट्टीचा फायदा घेत 'महावतार नरसिंह' ने ८.१५ कोटी रुपये कमावले. तर काल सोमवारी २.२५ कोटी रुपये कमावले. या अॅनिमेटेड चित्रपटाचे एकूण २१२.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vandana Gupte: पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडले...; वंदना गुप्तेंच्या पायाला झाली दुखापत मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाल्या...

Viral Video: सेल्फीच्या नादात मुलगी पडली धबधब्यात, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Metro T2 Walkway : वाहतूक कोंडीला मिळणार पूर्णविराम! मेट्रो ते विमानतळ टर्मिनलचा प्रवास आता फक्त काही मिनिटांत

B Sudarshan Reddy : इंडिया आघाडीचं धक्कातंत्र, उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा, एनडीएपुढे जोरदार आव्हान

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT