Big Boss 19 Contestants: सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस 19बद्दल नवी अपडेट्स समोर आली आहेत. या शोचा प्रीमियर 24 ऑगस्ट 2025 रोजी सुरु होणार असून, यावेळी शोची संकल्पना ‘घरवाल्यांची सरकार’ अशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धकांना नवे ट्विस्ट्स आणि आव्हाने सामोरे जावे लागणार आहेत.
या सीझनसाठी काही नाव कन्फॉर्म झाली असून त्यात टीव्ही व सोशल मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे आहेत. यामध्ये लेखक व अभिनेता जीशान कादरीचा समावेश आहे. जीशानने 'गँग्स ऑफ वासेपूर'ची कथा आणि पटकथा लिहिली होती . याशिवाय 'गँग्स ऑफ वासेपूर', 'बिच्छू का खेल' आणि 'युअर ऑनर २' सारख्या वेब सिरीजमध्ये त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तसेच या सीझनमध्ये अभिनेत्री अशनूर कौर, अभिनेता गौरव खन्ना, तसेच बसीर अली हे प्रमुख तीन स्पर्धक कन्फर्म झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आवेज दरबार, नगमा मिराजकर, अभिनेत्री शफक नाझ तसेच अॅक्टिविस्ट अतुल किशन यांचाही शोमध्ये सहभाग असल्याचे निश्चित झाल्याचे आहे.
तसेच पत्रकार नयनदीप रक्षित, यूट्यूबर पायल गेमिंग, अभिनेत्री हुनर हाली, आणि अभिनेता सिवेत तोमर यांची हे देखील या सीझनमध्ये दिसणार आहेत. काही अहवालांनुसार आणखी काही नव्या वाइल्ड कार्ड एंट्रीज पुढील आठवड्यांत दाखल होऊ शकतात.
माहितीनुसार, यंदा हा सीझन जवळपास पाच महिने चालेल आणि आतापर्यंत जाहीर झालेले 10 ते 15 स्पर्धक हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहेत. एकूणातच, बिग बॉस 19 मध्ये टीव्ही कलाकार, सोशल मीडिया स्टार्स, इन्फ्लुएंसर्स आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींचा संगम दिसणार असून, शोच्या सुरुवातीपासूनच रंगतदार ड्रामा आणि मोठ्या चर्चांचा तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.