Mom To Be Deepika Padukone Shared Embroidery Work Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Embroidery Work: गरोदरपणात दीपिका पदुकोण काय करतेय?, फोटो शेअर करत दाखवली झलक

Deepika Padukone Post: सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसतेय. नुकतंच अभिनेत्रीने शिवणकाम करतानाचे काही फोटोज् शेअर केलेले आहेत.

Chetan Bodke

Mom To Be Deepika Padukone Shared Embroidery Work

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हे कायमच बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर आणि दीपिकाने आई- बाबा होणार असल्याची गुड न्यूज त्यांनी चाहत्यांना दिली होती. येत्या सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका बाळाला जन्म देणार आहे.

सध्या अभिनेत्री प्रेग्नन्सी एन्जॉय करताना दिसतेय. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्री बाळाच्या कपड्यांसाठी शिवणकाम करताना दिसत आहे. सध्या तिच्या ह्या इन्स्टाग्राम पोस्टची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत होत आहे. (Bollywood)

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी दीपिका सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच दीपिकाने इन्स्टाग्रामवर भरतकाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. “आशा आहे की, हे भरतकाम पूर्ण झाल्याचा फोटोही मी शेअर करू शकेन.” असं पोस्टला तिने कॅप्शन दिलेले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, दीपिकाने पाने आणि फुलाची सुंदर डिझाईन तिने काढलेले दिसत आहे. सध्या प्रेग्नेंसीच्या काळात भरतकाम शिकण्याचा प्रयत्न करत आहे. (Bollywood Actress)

दीपिकाच्या ह्या कामाचे सध्या चाहते कौतुक करीत आहे. 'दीपिका खूपच हुशार आहे, ती लवकरच सुंदर भरतकाम शिकेन...', 'तू भरतकाम खूप सुंदर पद्धतीने करतेय, किप इट अप', 'तु तुझ्या आयुष्यातला सर्वोत्तम वेळ घालवत आहेस, असं दिसतंय.', 'तु भरतकाम केलेली गोष्ट पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' अशा कमेंट्स चाहते करीत आहेत. (Deepika Padukone)

दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचे तर, दीपिका शेवटची 'फायटर' चित्रपटामध्ये दिसलेली होती. आता लवकरच दीपिका 'कल्की 2898' या चित्रपटातून टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. त्यासोबतच 'लव्ह 4 एव्हर' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटातूनही ती चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT