Aatli Baatmi Phutli Saam tv
मनोरंजन बातम्या

Aatli Baatmi Phutli: एका खूनाच्या सुपारीचे रहस्य उलगडणार; 'आतली बातमी फुटली' चित्रपटाचा रंजक टिझर भेटीला

Aatli Baatmi Phutli Marathi Movie: 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Aatli Baatmi Phutli: मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे 'आतली बातमी फुटली’ हा चित्रपट. टिझर मधून हे रहस्य, धमाल आणि चित्रविचत्र घटना यांची मजेशीर झलक पाहायला मिळतेय. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला 'आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. हा कॉमेडी क्राइम सिनेमा धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘सरप्राईज’ करेल असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला.

'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT