Raj Thackeray Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे आणि सलमान खानमध्ये झाली भेट; नेमकं कारण काय?

Raj Thackeray Meets Salman Khan- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी भेट घेतली आहे

Manasvi Choudhary

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी भेट घेतली आहे. राज ठाकरे हे सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येक नंबर या मराठी चित्रपटाच्या निमित्त ही भेट घेतली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासाठी राज ठाकरे यांनी सलमान खान यांची भेट घेतली आहे.

२५ सप्टेंबरला येक नंबर या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा आहे. वांद्रेमधील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये हा लाँचिंग सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता अमिर खान, दिग्दर्शक, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, निर्माता साजिद नाडियादवाला ही दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे.

येक नंबर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अलिकडेच चित्रपटाच्या शुटिंगवरील फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्कुंठा वाढली. अलिकडेच येक नंबर या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज झाला. ज्यामुळे चित्रपटात महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्वाची मूख्य भूमिका असणार हे चित्र समोर आले. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर हे येक नंबर चित्रपटाची निर्मिती करत आहेत. येक नंबर हा चित्रपट १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT