Mitali Mayekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mitali Mayekar : 'रिॲलिटी शो आहे की...' मिताली मयेकरचा सूरजला टोला

Suraj Chavan : सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता झाला आहे. यामुळे काही लोक नाखूश देखील आहेत. यात काही कलाकारांचा समावेश आहे. अशात मिताली मयेकरने देखील सोशल मिडियावर या संबंधात पोस्ट केली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले खूप गाजला. गुलीगत सूरजने विजेते पदाचा मान मिळवला आहे. तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. सूरज जिंकल्यामुळे जसा अनेकांना आनंद झाला. तसाच काहींनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रेक्षकांसोबत कलाकारांचा देखील समावेश आहे.

मराठी अभिनेत्री मितालीने सोशल मीडियावर एक स्टोरी टाकली होती. जी सध्या खूप व्हायरल होत आहे. मात्र ती स्टोरी मितालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलिट केली आहे. ही स्टोरी म्हणजे बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाणला (Suraj Chavan) डायरेक्ट टोला आहे. तिनं सूरजच्या बिग बॉस जिंकण्यावर थेट प्रश्न निर्माण केला आहे.

मिताली इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाली की, 'हा रिॲलिटी शो की सिंपथी शो?' आणि त्यापुढे तिने ईमोजी टाकले आहेत. सूरजला विजेता बनवून बिग बॉसने त्याच्यावर दया केली आहे. असे तिचे एकंदर म्हणणे असल्याचे पाहायला मिळत आहे.

mitali mayekar

मराठी सिनेसृष्टीतील मिताली (Mitali Mayekar) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सिद्धांत चांदेकरची ती बायको आहे. मिताली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या लूकचे आणि ट्रीपचे फोटो नेहमीच ती शेअर करत राहते. तसेच आपली मते देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करते. असेच मत तिने सूरज बिग बॉसचा विजेता झाल्यावर व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT