Miss Universe India 2025 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Miss Universe India 2025 : राजस्थानच्या सुंदरीने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब, पाहा PHOTOS

Manika Vishwakarma-Miss Universe India 2025 : राजस्थानची सुंदरी मनिका विश्वकर्माने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा किताब जिंकला आहे. आता ती थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Shreya Maskar

मनिका विश्वकर्माने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब जिंकला.

मनिका विश्वकर्मा राजस्थानची राहणारी आहे.

मनिका विश्वकर्मा आता थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. मनिका विश्वकर्मा (Manika Vishwakarma) हिने 'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' चा ( Miss Universe India 2025) किताब जिंकला आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनिका ही मूळची राजस्थानच्या (Rajasthan ) श्रीगंगानगर इथे राहणारी आहे.

राजस्थानमधील जयपूर येथे 'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' ची विजेता मनिका विश्वकर्मा थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मनिका विश्वकर्मा 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करेल. मनिका विश्वकर्माने यापूर्वी मिस युनिव्हर्स राजस्थान 2024 चा किताब जिंकला होता.

'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' विजेत्यांची यादी

  • मनिका विश्वकर्मा (राजस्थान) - विजेती

  • तान्या शर्मा (उत्तर प्रदेश) - पहिली रनर-अप

  • मेहक धिंग्रा (हरियाणा) - दुसरी रनर-अप

  • अमिषी कौशिक -तिसरी रनर-अप

कोण आहे मनिका विश्वकर्मा?

मनिका विश्वकर्मा ही सध्या दिल्लीत राहते. मनिका विश्वकर्माने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेतले आहे. मनिका विश्वकर्माने दिल्लीमध्ये मॉडेलिंगचे करिअर सुरू केले.

मनिका विश्वकर्मा प्रतिक्रिया

'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' किताब जिंकल्यावर मनिका विश्वकर्माने तिच्या शिक्षकांचे, पालकांचे, कुटुंबाचे, मित्रांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogawale: मंत्री भरत गोगावले रोहा पालिका मुख्यधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, काय आहे संपूर्ण प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

Jio Prepaid Plans: जिओची धमाकेदार ऑफर! अतिरिक्त डेटा अन् एंटरटेनमेंटची मेजवानी

शिवेंद्रराजे यांनी सातारा गॅझेटवर केला खुलासा; म्हणाले... VIDEO

Shocking : ९ मुले, तिघे विवाहित; नातवंडांशी खेळण्याच्या वयात महिला २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळाली

SCROLL FOR NEXT