Mirzapur SAAM TV
मनोरंजन बातम्या

मुन्ना भैयाचं रॉयल कमबॅक, 'Mirzapur'च्या गादीचा खेळ आता मोठ्या पडद्यावर!

Mirzapur Movie Teaser : 'मिर्झापूर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Shreya Maskar

'मिर्झापूर' (Mirzapur) वेब सीरिजने ओटीटीवर आपली जादू दाखवून आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. आता पर्यंत 'मिर्झापूर'चे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तिन्ही सीझन एकापेक्षा एक भन्नाट होते. या सर्व सीझनला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला म्हणून मुन्ना भैया आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

'मिर्झापूर'च्या सीरिजमधील पात्र गुड्डू पंडीत , कालीन भैया प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरले. प्रेक्षकांना मिर्झापूरने वेड लावले. आता 'मिर्झापूर' मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 'मिर्झापूर'चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. थिएटरमध्ये आता तुम्हाला गादीचा खेळ पाहायला मिळणार आहे. नुकताच 'मिर्झापूर' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कालीन भैया, गुड्डू पंडीत आणि मुन्ना भैया पाहायला मिळत आहे. या टीझरला त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. 'भौकाल भी बडा होगा और पडदा भी' असं लिहिलं आहे.

टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता, कालीन भैया म्हणतो की, "तुम्हाला खुर्चीचे महत्त्व माहितच असेल. सन्मान, शक्ती आणि सत्ता." त्यानंतर गुड्डू पंडीतची एन्ट्री होते आणि तो म्हणतो की, "रिस्क घेणे ही आमची युएसपी आहे. मात्र आता 'मिर्झापूर' तुमच्या जवळ नाही तर तुम्हाला 'मिर्झापूर'ला यावे लागेल. " तेवढ्यात मुन्ना भैयाची एन्ट्री होते आणि तो म्हणतो की, "मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे आणि हिंदी चित्रपट थिएटर मध्येच दिसतात." या दमदार टीझरमुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली आहे.

'मिर्झापूर'चा टीझर पाहून प्रेक्षकांना खूपच आनंद झाला आहे. चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाढत आहे. या टीझरवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'मिर्झापूर' हा चित्रपट गुरमीत सिंह दिग्दर्शित आहे आणि तो 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा हे कलाकार तुम्हाला 'मिर्झापूर' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT