Mirzapur 3 Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 Online Leaked : 'मिर्झापूर ३' सीरीजचे सर्व एपिसोड ऑनलाईन लीक, निर्मात्यांना मोठा झटका

Mirzapur 3 All Episodes Online Leaked : बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर ३' वेबसीरीज आज रिलीज झाली आहे. रिलीज होताच अवघ्या काही तासांतच ही वेबसीरिज ऑनलाईन लीक झालेली आहे.

Chetan Bodke

मोस्ट अवेटेड 'मिर्झापूर ३' ही वेबसीरीज आज (५ जुलै) 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ' वर रिलीज झालेली आहे. सीरीज रिलीज होताच निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. सीरीज रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही वेब सीरिज एचडी स्वरूपात ऑनलाईन लीक झालेली आहे.

'मिर्झापूर' सीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी सीरीजचा तिसरा सीझन काढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीरीजबद्दलची प्रेक्षकांना उत्सुकता होती. वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळत असताना ही सीरीज ऑनलाईन लीक झालेली आहे. यामुळे 'मिर्झापूर'च्या निर्मात्यांसोबतच दिग्दर्शकांनाही मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर प्रेक्षकांना दमदार आणि वेगवेगळ्या धाटणीचे सीरीज आणि चित्रपट पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक युजर्सने प्राईम व्हिडीओचे सब्स्क्रिप्शन्स घेतले होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पैसे देऊन सब्स्क्रिप्शन घेण्याऐवजी सीरीज किंवा चित्रपट ऑनलाईन मोफत डाउनलोड करून पाहिल्यामुळे याचा सर्वाधिक फटका निर्मात्यांना सहन करावे लागतो. पायरसीचा मोठा फटका निर्मात्यांना अनेकदा बसलेला आहे.

'मिर्झापूर ३'चे ४५ मिनिटांचे एकूण १० एपिसोड्स आहेत. मुन्ना भैय्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी गुड्डू पंडितकडे मिर्झापूरची सूत्रे येतात. कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठी त्याला साथ देतात. आता कालिन भैय्या गुड्डू भैय्याचा कसा बदला घेणार ? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहे. एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित, 'मिर्झापूर' सीझन 3 चे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीशिवाय अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैनयुली, हर्षिता शेखर गौड, राजेश तेलंग, शीबा चढ्ढा, मेघना मलिकसारख्या आदी कलाकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT