kapil sharma on KKR Google
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma : मिका सिंगनं सांगितला कपिल शर्माचा तो किस्सा! KRK ला मारायचं होतं, दुबईच्या घरीही धिंगाणा

kapil sharma : कपिल शर्माने केआरकेवर इतका रागावला होता की तो त्याच्या घरी गेला आणि त्याच्या घरच्या काचा फोडून गोंधळ घातला होता असा किस्सा मिका सिंग याने एका मुलाखतीत सांगितला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

kapil sharma : आपल्या विनोद बुद्धीने प्रेक्षकांना पोट भरून हसवणारा कपिल शर्मा त्याच्या जुन्या विवादांमुळे देखील प्रसिद्ध आहे त्याने कालांतराने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवले. पण त्याचा एक जुना किस्सा त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितल्यापासून पुन्हा एकदा कपिल शर्मा चर्चेत आला आहे. हा मित्र दुसरा कोणी नसून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मिका सिंग आहे. कपिलने एकदा रंगात केकेआरच्या घराच्या काचा फोडून गोंधळ घातल्याचे गुपित एका मुलाखतीत सांगितले आहे.

मिका सिंगने म्हटले की कपिल शर्मा एकेकाळी सोशल मीडिया स्टार कमाल आर खान म्हणजेच केकेआरवर इतका रागावला होता की त्याने त्याला मारहाण करण्याची धमकी दिली होती. मिकाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, केआरके दुबईमध्ये त्याचा शेजारी राहत होता. त्यानंतर त्याने सांगितले की कपिल केआरकेवर इतका नाराज होता की तो त्याच्या घरी गेला आणि एक गडबड करून आला.

मिका सिंग पुढे म्हणाले, २०१२-२०१३ साली केआरकेवर कपिल शर्मा खूप नाराज होता. जेव्हा त्याला कळले की केआरके माझा शेजारी आहे, तेव्हा कपिल त्याला मारहाण करू इच्छित होता. त्याला त्या रात्री त्याच्या घरी जाऊन मारावे असे वाटत होते. मी त्याला असे करू नये अशी विनंती केली. त्यानंतर, आम्ही पहाटे ४-५ च्या सुमारास त्याच्याकडे गेलो, पण तो घरी नव्हता, म्हणून त्याने त्याच्या घराची काच फोडली आणि गोंधळ घातला.

मिकाने हनी सिंग देखील केकेआरवर खूप रागावला होता. मिका सिंग म्हणाला, "हनीला कदाचित आता हे आठवत नसेल पण केआरकेने हनीबद्दल काहीतरी सांगितले होते. हनी खूप नाराज झाला आणि मला म्हणाला, 'पाजी ये ऐसा ऐसा बोलता है', आयुष्मान खुराना, कपिल शर्मा देखील केआरकेवर खूप नाराज होते. म्हणून मी हनीला सांगितले, आपण त्याच्याकडे जाऊ, दुबईला त्याला भेटू आणि बोलू, आपण दोघेही दारू पिल्यासारखे वागू.आम्ही त्याच्याशी खूप असभ्यपणे वागलो. दुसऱ्या दिवशी केआरकेने आम्हाला सांगितले की आम्ही त्याच्याशी खूप वाईट वागलो. आणि मी त्याला सांगितले की आम्ही दारू पिल्यामुळे मला काहीही आठवत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: कोण उठलं मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी?

Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

शिळी पोळी पोटात गेल्यानंतर शरीरात पाहा काय बदल होतात?

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT