Mika Singh Slams Bipasha Basu Saamtv
मनोरंजन बातम्या

Mika Singh: 'ती तिच्या कर्मामुळेच घरी बसलीय...', मिका सिंगचा बिपाशा बासूवर निशाणा, काय आहे दोघांमधील वाद?

Mika Singh Slams Bipasha Basu: एका मुलाखतीत मिका सिंगने बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरवर कमेंट करत बिपाशा बासूवर हल्लाबोल केलाय. बिपाशाला आपल्या कर्माचं फळ मिळत आहे, असा शाब्दिक हल्ला मिकाने केलाय.

Bharat Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू बऱ्याच वर्षांपासून पदड्यापासून गायब आहे. बिपाशा पती करण सिंह ग्रोवर आणि लेकीसोबत ती संसारात व्यस्त आहे. गायक मिका सिंगसोबत करण आणि बिपाशाचा जुना वाद आहे. पण सिनेमाच्या पडद्यापासून दूर असलेल्या बिपाशावर गायक मिका सिंहने निशाणा साधत तिला टोला लगावलाय. ती तिच्या कर्मामुळेच घरी बसली असल्याचा टोला मिका सिंगने लागवलाय. पण त्याने कशामुळे तिच्यावर टीका केली? दोघांमधील वाद काय आहे? हे प्रकरण जाणून घेऊ.

काय आहे वाद?

मिकाने त्याच्या पहिल्या निर्मिती सिनेमात करण-बिपाशाला घेतलं होतं. त्याच दरम्यान त्यांच्यात वाद सुरू झाला होता. चित्रपटाचं शुटिंग सरू असताना दोघांनी खूप नखरे दाखवले होते, असं मिका म्हणालाय. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मिकाने बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरवर कमेंट केली आहे. कर्माचं फळ मिळत आहे, असा शाब्दिक हल्ला मिकाने केलाय. मुलाखतीत मिकाला बिपाशाला काम का मिळत नाही? असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावर मिका म्हणाला, "देव सगळं बघतोय. मला करण खूप आवडायचा. त्याला घेऊन मला सिनेमा प्रोड्युस करायचा होता.

या चित्रपटाचं बजेट जवळपास ४ कोटी रुपयांचं होतं. त्या सिनेमात दुसऱ्या एका अभिनेत्रीला घेणार होतो. पण बिपाशाला त्या चित्रपटात काम करायचं होतं. मी तिला घेणार नव्हतो. पण बिपाशा बळजबरीने या सिनेमाचा भाग बनली. बिपाशा स्वत: आली. लंडनमध्ये सिनेमाचं शूट होतं. चित्रपटाचे बजेट हे ४ कोटी होतं, पण ते नंतर १४ कोटींवर गेलं. मला आर्थिक चिंता होत होती. चित्रपटाचं बजेट वाढण्याचं खरं कारण सेटवर आल्यावर आपल्याला समजल्याचं मिका म्हणाला. सेटवर बिपाशा अजिबातच सहकार्य करत नव्हती.

तिचे नखरे पाहून चित्रपट निर्मितीचा पश्चात्ताप होत होता. नवरा बायको असूनही ते रोमॅन्टिक सीन्स द्यायलाही नकार देत होते." चित्रपटात एक किसींग सीन होता. आणि हे कथेचाच भाग होता. पण बिपाशाने ऐनवेळी नकार दिला. हे करणार नाही ते करणार नाही हेच तिचं सुरू होतं. ज्या अभिनेत्रींजवळ काम नाही ते नेहमीच नशिबाला दोष देतात. पण जे काम घेऊन आलेत त्या निर्मात्यांचाही आदर केला पाहिजे, असं मिका म्हणाला. त्यामुळेच ती आज तिच्या कर्माचंच फळ भोगत आहे म्हणून ती घरी बसली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT