HC Withdraw Case Against Mika Singh: ‘या’ प्रकरणात मिक सिंगला तब्बल १४ वर्षानंतर दिलासा, विनयभंगाचा गुन्हा रद्द

HC Withdraw Molestation Case Against Mika Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगला मुंबई हायकोर्टाकडून एका जुन्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.
HC Withdraw Case Against Mika Singh
HC Withdraw Case Against Mika Singh Saam Tv
Published On

Bombay HC Withdraw 2006 Case Against Mika Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. १७ वर्षे जुन्या बळजबरीने किस केल्याप्रकरणात त्याला हा दिलासा मिळाला आहे. २००६ मध्ये अभिनेत्री राखी सावंतने मिका सिंगविरोधात बळजबरीने किस केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी तिने मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात मिका सिंगविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात हायकोर्टाने गुरुवारी मिका सिंगला दिलासा देत हा गुन्हा रद्द केला आहे.

HC Withdraw Case Against Mika Singh
Marathi Actress In Adipurush : आदिपुरुष पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना मिळाले सरप्राईज; मराठमोळी अभिनेत्री चित्रपटामध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये मिका सिंगने गैरवर्तन करत किस केल्याचा आरोप राखी सावंतने केला होता. राखी सावंतने याप्ररणी मिका सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ११ जून २००६ मध्ये ओशिवरा पोलिसांनी मिका सिंगविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच प्रकरणात मिका सिंगला तब्बल १७ वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. कारण कोर्टाने त्याच्याविरोधातील हा गुन्हा रद्द केला आहे.

याप्रकरणी मिकाविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि आरोपपत्र दोन्हीही राखी सावंतच्या संमतीने रद्द करण्यात आले आहे. मिका सिंगसोबत त्याचा जुना सहकारी विक्की सिंग यानेही राखी सावंतच्या संमतीने मुंबई हायकोर्टाकडे हे प्रकरण संपवण्याची मागणी केली होती. राखीने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले की, 'मी आणि मिका सिंगने चर्चा करून हा प्रश्न सोडवला आहे.'

HC Withdraw Case Against Mika Singh
Emraan Hashmi South Cinema Debut: बॉलिवूडनंतर इम्रान हाश्मीची टॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘या’ तेलुगू चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

हे प्रकरण असे आहे की, मिका सिंगने मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये त्याने राखी सावंतला बोलावले होते. पार्टीदरम्यान मिकाने किस केल्याचा आरोप राखी सावंतने केला होता. यानंतर संतप्त राखीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धावे घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मिकाविरोधात भादवि कलम ३५४ (विनयभंग) आणि ३२३ (प्राणघातक हल्ला) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या जुन्या प्रकरणातील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची विनंती करत मिकाने यावर्षी एप्रिलमध्ये हायकोर्टात धाव घेतली होती.

HC Withdraw Case Against Mika Singh
Sunny Deol Mehendi Video: सनी देओलची मुलाच्या लग्नात हटके मेहंदी; नेमका अर्थ काय? लोकांची गूगलवर शोधमोहिम

मिकाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत हे स्पष्ट केले, 'या घटनेला बराच काळ लोटला असून राखी आणि आपल्यात आता मैत्रीचे संबंध आहे.' त्यानंतर आता राखीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत हा गुन्हा मागे घेण्याची विनंती केली होती. राखीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर कारवाई करत न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने मिका सिंग विरोधातील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com