Metro In Dino Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

Metro In Dino Box Office Collection Day 2 : सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. चित्रपटाने वाकेंडला बंपर कमाई केली आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) हा चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'मेट्रो इन दिनों' हा रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले आहे.'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो' या 2007 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटाने दोन दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'मेट्रो इन दिनों' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

तगडी स्टारकास्ट असलेला 'मेट्रो इन दिनों'ने बॉक्स ऑफिसवर आपली जागा तयार करायला सुरूवात केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी खूपच कमी कमाई केली. मात्र वीकेंडला 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाने बाजी मारली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी वीकेंडला 'मेट्रो इन दिनों'ने बंपर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चित्रपट आता लवकरच 10 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 6 कोटी रुपये कमावले आहे. दोन चित्रपटाचे एकूण कलेक्शन 9.5 कोटी रुपये झाले आहे. आता रविवारी चित्रपट काय जादू दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच प्रेक्षकांच्या रिव्ह्यूमधून असे दिसून येते की, चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे भविष्यात चित्रपट चांगली कमाई करेल असे बोले जात आहे.

  • दिवस पहिला - 3.5 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 6 कोटी रुपये

  • एकूण - 9.5 कोटी रुपये

'मेट्रो इन दिनों' स्टारकास्ट

'मेट्रो इन दिनों' चित्रपटात चार जोड्या पाहायला मिळत आहे. चार वेगवेगळ्या प्रेमकथा एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटात 8 मुख्य कलाकार पाहायला मिळत आहे. यात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांचा समावेश आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikhat Mithacha Sanja Recipe : घाईगडबडीत पटकन बनवा तिखट मिठाचा सांजा, ५ मिनिटांत नाश्ता तयार

Apurva Nemlekar: नऊवारी साडी अन् कपाळी चंद्रकोर...; अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक पारंपारिक श्रृंगार पाहिलात का?

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये मोठा बदल, भारत- पाकिस्तान सामन्याचंही टायमिंग बदललं, नवीन अपडेट आली समोर

Gauri Ovsa: गौरी- गणपतीच्या सणाला सुवासिनीचा ओवसा का महत्वाचा? जाणून घ्या

Maratha Reservation : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात सामील मराठा तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT