Uttar Pradesh Fashion Influencer Nancy Tyagi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Who Is Nancy Tyagi : कान्स फेस्टिव्हलमध्ये २० किलोचा ड्रेस घालणारी नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

Cannes Film Festival 2024 : नॅन्सी त्यागीच्या फॅशनने कान्स फेस्टिव्हलमध्ये सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या ड्रेसचे जगभरात कौतुक होत आहे. नेमकी तिच्या ड्रेसची सध्या इतकी का चर्चा होतेय ? जाणून घेऊया तिच्या ड्रेसबद्दल...

Chetan Bodke

सध्या बॉलिवूडसह संपूर्ण जगभरात कान्स फिल्म फेस्टिवलची (Cannes Film Festival 2024) जोरदार चर्चा सुरू आहे. ऐश्वर्या राय बच्चन, कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, आदिती राव हैदर यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. पण अशातच सध्या चर्चा होते ती उत्तरप्रदेशच्या नॅन्सी त्यागीची. नॅन्सीच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या ड्रेसचे जगभरात कौतुक होत आहे. नेमकी तिच्या ड्रेसची सध्या इतकी का चर्चा होतेय ? जाणून घेऊया तिच्या ड्रेसबद्दल...

उत्तर प्रदेशची रहिवासी असलेल्या नॅन्सी त्यागीच्या लूकची सध्या जगभरात चर्चा होत आहे. नॅन्सी बागपत जिल्ह्यातील बरनवा गावातील रहिवासी आहे. ऐश्वर्या राय, उर्वशी रौतेला, नमिता थापरसोबत अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच नॅन्सीच्याही लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. नॅन्सीने कान्स फेस्टिव्हलसाठी तो स्पेशल गाऊन बनवला होता. ३० दिवस, १००० मीटर फॅब्रिक आणि २० किलोपेक्षा जास्त वजनाचा हा गुलाबी गाऊन तिने मनापासून तयार केला आहे. सध्या तिच्या ह्या गाऊनचे जोरदार कौतुक केले जात असून कान्स फेस्टिव्हलमध्ये तो गाऊन घालून मिरवणं हा तिच्यासाठी खास क्षण होता.

नॅन्सीचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून त्यानंतर तिने युपीएससी स्पर्धा परिक्षाची तयारी सुरू केली होती. युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ती दिल्लीत स्थलांतरित झाली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे कोचिंग क्लासेस बंद झाल्यामुळे तिने घरबसल्या पैसे कमावण्यास सुरूवात केली होती. सेलिब्रिटींचे आऊटफिट्स आणि प्रसिद्ध डिझायनर्सच्या स्टाईलची कॉपी करून तिने स्वत:साठी ड्रेसेस बनवायला सुरुवात केली. तिच्या आऊटफिट्सची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

२१ वर्षीय नॅन्सी तिच्या हटक्या स्टाइल आणि क्रिएटिव्ह डिझाइन्ससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर आउटफिट डिझाइन्ससाठी व्हिडीओ बनवते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॅन्सीने डिजीटल क्रिएटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. नॅन्सीचे इन्स्टाग्रामवर तब्बल 870,000 इतके फॉलोवर्स आहेत. तर युट्यूबवर तिला एक मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT