Lagna Kallol Motion Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagna Kallol: १ मार्चला होणार 'लग्न कल्लोळ', तुम्ही येताय ना पाहायाला?; चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

Upcoming Marathi Film: नुकताच या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत असून प्रेक्षक रिलीज होण्यासाठी वाट पाहत आहेत.

Priya More

Lagna Kallol Movie:

२०२३ हे वर्ष मराठी सिनेरसिकांसाठी खूपच खास ठरले. या वर्षामध्ये अनेक चांगल्या धाटणीचे आणि जबरदस्त कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता २०२४ या वर्षात देखील मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवाणी असणार आहे. या वर्षामध्ये देखील अनेक मराठी चित्रपटांची (Marathi Movie) घोषणा झाली आहेत. तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. यामधीलच एक चित्रपट म्हणजे 'लग्न कल्लोळ' (Lagna Kallol Movie). नुकताच या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत असून प्रेक्षक रिलीज होण्यासाठी वाट पाहत आहेत.

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार? हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही देखील निर्मात्यांनी जाहीर केली आहे. 'लग्न कल्लोळ' हा चित्रपट येत्या १ मार्चला रिलीज होणार आहे.भूषण, मयूर आणि सिद्धार्थने हातामध्ये घेतलेली वरमाला नक्की कोणाच्या गळ्यामध्ये पडते? हे आपल्याला १ मार्चला पाहायला मिळेल. या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसून येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे पोस्टरवरून दिसून येत आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

SCROLL FOR NEXT