Mi Honar Superstar canva
मनोरंजन बातम्या

Mi Honar Superstar: यवतमाळच्या चिमुकलीची मोठी झेप,गीत बागडेने 'छोटे उस्ताद ३' च्या ट्रॉफीवर कोरलं नाव,पैशांचा पाऊस!

Mi Honar Superstar Chhote Ustad 3: सध्या काल टिव्हीवर 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात गीत बागडे महाविजेती ठरलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या टिव्हीवर अनेक शो येत असतात. काही नागरिक त्यांचे फेव्हरेट शो पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. याबरोबर टिव्हीवरील लहान मुलांच्या शोला नेहमीच प्रेक्षकवर्गाची खूप पंसती मिळत असते. टिव्ही पडद्यावर असलेली ही लहान मुले त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकत असतात. असाच एक कार्यक्रम स्टार प्रवाह चॅनेलवर सुरु होता.

स्टार प्रवाह चॅनेलवरील हा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' हा होता. या कार्यक्रमात अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला होता. याबरोबर या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिला होता. सध्या या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा आनंदात आणि जल्लोषात पार पडला आहे.

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत सहा छोटे कलाकार सहभागी होते. याबरोबर या सहा छोट्या उस्तांमध्ये सुरांची बाजी सुरु होती. या सहा उस्तांमध्ये जुई चव्हाण,पलाक्षी दीक्षित, देवांश भाटे,स्वरा किंबहुने आणि गीत बागडे, सारंग भालके सामील होते. पण या कार्यक्रमाची महाविजेती यवतमाळची गीत बागडे झाली आहे. तिने सुरांची बाजी मारत हे विजेतेपद मिळवले आहे.

गीत बागडेला या कार्यक्रमा तर्फे पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. तर या कार्यक्रमातील उपविजेता संगमनेरचा सारंग भालके ठरला आहे. याबरोबर विरारच्या पलाक्षी दीक्षितने तुतीय क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातील उत्तेजनार्थ पारितोषिक विभागूण देण्यात आलं आहे.

कार्यक्रमाची विजेती ठरलेल्या गीत बागडेला खूप आनंद झाला आहे. गीतने आपला आनंद सगळ्यांसमोर व्यक्त केला आहे. तिचे असे म्हणने आहे की, मी बाबांच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा जिंकलेली आहे. स्टार प्रवाह मंचाने मला खूप काही दिले आहे. या मोठ्या मंचातून मला आत्मविश्ववासाबरोबर खूप काही गोष्टी शिकाल्या मिळाल्या आहेत. याबरोबर गीतने मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत सर यांचे खूप आभार मानले आहे. याबरोबर तिने मंचावरील सर्व गुरुंचे ही खूप आभार मानले आहे. शेवटी गीत बागडेला तिच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे ती स्टार प्रवाह मंचाची खूप ऋणी आहे.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT