Marathi Serial TRP Report Saam Tv
मनोरंजन बातम्या

TRP Rating Of Marathi Serial: टीआरपी शर्यतीत तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ची पिछाडी, ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ने घेतली आघाडी

Marathi Serial TRP Report: टेलिव्हिजन सिरियल चॅनेलचा लेटेस्ट TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारीपर्यंतचा TRP रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Chetan Bodke

TRP Rating Of Marathi Tv Serial 03rd February To 09th February

टेलिव्हिजन सिरियल चॅनेलचा लेटेस्ट TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारीपर्यंतचा TRP रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. हा TRP रिपोर्ट 'मराठी टेलिबझ ऑफिशियल' या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. टीआरपीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा जुई आणि अमितच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेनेच बाजी मारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेने टीआरपी यादीमध्ये आपलं पहिल्या क्रमांकावरील स्थान कायम ठेवलं आहे. तर तेजश्री प्रधानच्या‘प्रेमाची गोष्ट’मालिकेला टीआरपी चार्टमधलं आपलं स्थान गमवावं लागलं आहे. (Tv Serial)

‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेमध्ये प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर नवनवे ट्विस्ट अनुभवायला मिळत आहे. मालिकेमध्ये येणाऱ्या नवनव्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या शर्यतीत टॉप १ आणि टॉप २ ला कायम राहिली. या मालिकेला जाहीर झालेल्या टीआरपी यादीमध्ये ७ इतकी रेटिंग मिळाली आहे. टेलिकास्ट होत असल्यापासून अनेक सिरियल्सला मागे सारत, या मालिकेने टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर स्वत:चे नाव कोरलेय. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली असून पती-पत्नीची एक वेगळीच लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. (Marathi Film)

तर दुसऱ्या क्रमांकावर ईशा केसकरची आणि अक्षर कोठारीची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ही मालिका आहे. ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टॉप ५ यादीतून गायब होती. ईशा केसकरची पुन्हा एकदा मालिका टीआरपी यादीमध्ये आली आहे. सध्या ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून टीआरपी यादीमध्ये या मालिकेला ६.८ इतकी रेटिंग मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आहे. या मालिकेला ६.७ इतके रेटिंग मिळाले असून मालिकेमध्ये अनेकदा नवनवे ट्रॅक्स आले. (Star Pravah)

तर चौथ्या स्थानावर स्वरा आणि मल्हारची ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आली आहे. या मालिकेला टीआरपी रेटिंगमध्ये ६.४ इतकी रेटिंग मिळाली असून स्टार प्रवाहावरील अनेक मालिकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर एकेकाळी टीआरपी चार्टमध्ये टॉपला असलेली अरुंधतीची ‘आई कुठे काय करते’ही मालिका सुद्धा टीआरपीच्या शर्यतीतून दिवसेंदिवस गायब होताना दिसत आहे. ही मालिका सध्या सहाव्या क्रमांकावर असून या मालिकेला ५.६ इतके रेटिंग मिळाली आहे. टीआरपीच्या यादीमध्ये टॉप ५ पासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’,‘आई कुठे काय करते’आणि ‘कुण्या राजाची गं तू राणी’ सह अनेक मालिका टॉप १० मध्ये आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

SCROLL FOR NEXT