Ketaki Chitale On Manoj Jarange Patil Instagram
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale: ‘आता कसे, खरे रूप दिसले...’, मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale Post: केतकी चितळेने एक इन्स्टा स्टोरी शेअर करत मनोज जरांगे पाटलांनी केलेले वक्तव्य शेअर केले आहे. त्या वक्तव्यावरूनच केतकीने त्यांच्यावर टीका केली आहे.

Chetan Bodke

Ketaki Chitale On Manoj Jarange Patil

अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे समीकरण कायमच ठरलेलं आहे. जिथे केतकी तिथे वाद आपसुकच येतो. नुकतंच केतकीने तिच्या घरी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचारीसोबत हुज्जत घातली होती. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावरून ती चांगलीच ट्रोल झाली. त्या प्रकरणामुळे चर्चेत असतानाच केतकी चितळे आणखी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी केलेले वक्तव्य असून त्या वक्तव्यावरूनच तिने त्यांच्यावर टीका केली आहे. (Marathi Actress)

नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना.” असं विधान केलं होतं. हे विधान इन्स्टा स्टोरीवर शेअर करत तिने आपल्या खास अंदाजामध्ये त्यांच्यावर टीका केली आहे. (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य शेअर करत केतकी म्हणते, “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा.” असं कॅप्शन देत तिने स्टोरी शेअर केली. ही स्टोरी शेअर करून अवघे काही तासच झाले असून अवघ्या काही तासांतच अभिनेत्रीचीही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Social Media)

Ketaki Chitale On Manoj Jarange Patil Post

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याने केतकी चितळेला २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ती ४१ दिवस तुरुंगात होती. शरद पवारांबाबत केलेल्या पोस्टप्रकरणी तिच्याविरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. ४१ दिवसांनंतर तिची जामीनावर सुटका झाली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (Latest Marathi News)

केतकी चितळेबद्दल सांगायचे तर, सध्या केतकीकडे कोणताही चित्रपट किंवा मालिका नाही. ती जरीही सिनेसृष्टीपासून दूर असली तरीही, ती कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. केतकीने स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं होतं. शिवाय केतकी सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या हिंदी मालिकेतही झळकली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT