Jitendra Awhad News: शरद पवार पक्षाचे अध्यक्ष; अजित पवारांच्या नियुक्त्या कायदेशीर कशा? जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर...

जितेंद्र आव्हाड यांनी या नियुक्त्यांना कायदेशीर संविधानिक मान्यता नाही, असा दावा केला आहे.
JItendra Awhad
JItendra Awhadsaam tv
Published On

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. अजित पवार आणि शरद पवारांसोबत असलेल्या दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. काही वेळापुर्वीच अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेत सुनिल तटकरे यांची नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. मात्र याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी या नियुक्त्यांना कायदेशीर संविधानिक मान्यता नाही, असा दावा केला आहे.

JItendra Awhad
Ajit Pawar Statement: राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच; अजित पवारांचे ठाम मत

काय म्हणाले जिंतेद्र आव्हाड...

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी "शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहे का?" असा थेट सवाल उपस्थित केला.

तसेच "शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार का? शरद पवार अध्यक्ष आहेत.." असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

JItendra Awhad
Dombivali News: गार्डीयन शाळेत भाजप महिला कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; धकाबुक्कीचा व्हिडियो व्हायरल

यावेळी पुढे बोलताना " राष्ट्रवादी एकच पक्ष आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. हे त्या किटी पार्टीत बसलेल्या सगळ्यांनी मान्य केलं आहे. निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या पक्षाच्या संविधाननुसार पक्षाध्यक्षांना अधिकार दिले आहेत. अध्यक्षाला कोणत्याही पक्ष, समिती सदस्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्याचे अधिकार आहेत;" असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com