Dombivali News: गार्डीयन शाळेत भाजप महिला कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; धकाबुक्कीचा व्हिडियो व्हायरल

गार्डीयन शाळेत भाजप महिला कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; धकाबुक्कीचा व्हिडियो व्हायरल
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

डोंबिवली : शाळा प्रशासन स्थानिक विद्यार्थ्यांना एडमिशन देत नाही. तसेच उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप करत भाजप महिला कार्यकर्त्यांनी आज (Dombivali) डोंबिवली भोपरमधील गार्डियन शाळेत गोंधळ घातला. या दरम्यान (BJP) भाजप महिला कार्यकर्त्यां व शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भाजप महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Breaking Marathi News)

Dombivali News
Bribe Trap : सातबारा उताऱ्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्‍या ताब्‍यात

डोंबिवली पूर्वेकडील भोपर परिसरात गार्डीयन ही शाळा आहे. आज दुपारच्या सुमारास शाळेत स्थानिक मुलांना प्रवेश दिला जात नाही. शाळा प्रशासन पालकांसोबत उद्धट वर्तन करत असल्याचा आरोप करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळेत एकच गोंधळ घातला. यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाबाहेर भाजप महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शाळेतील शिक्षक कर्मचारी व भाजप महिला कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की देखील केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे शाळेत तासभर गोंधळाची परिस्थिती होती.

Dombivali News
Haribhau Rathod Statement: शिंदेचे सरकार खाली खेचून फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होतील; माजी खासदार हरिभाऊ राठोड

शाळेकडून आरोप फेटाळले

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर शाळा प्रशासनाशी बोलणं झाल्यानंतर या महिला तिकडून निघून गेल्या. तर याबाबत गार्डीयन शाळा प्रशासनाने भाजप कार्यकर्त्यांचा आरोप चुकीचा आहे. अशी कोणतीही चूक शाळेकडून घडली नाही आणि घडणार नाही. आजचा प्रकार गैरसमजुतीतून प्रकार घडलाय असे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com