Abhidnya Bhave Grandmother Passed Away Instagram
मनोरंजन बातम्या

Abhidnya Bhave Grandmother Dies: अभिज्ञा भावेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; पोस्ट शेअर करत म्हणाली, आयुष्यभर तुझ्या आठवणी...

Abhidnya Bhave Grandmother Passed Away: अभिनेत्रीने तिच्या आजीच्या निधनाची बातमी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

Chetan Bodke

Abhidnya Bhave Grandmother Death

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. प्रसिद्ध मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या एका जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने नुकतंच सोशल मीडियावर तिच्या आजीचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील बामती शेअर करत असते. अभिनेत्रीने तिच्या आजीच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

अभिज्ञाच्या आजीचं वयाच्य़ा ९३ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिज्ञाच्या आजीचं नाव प्रमिला भावे असं असून अभिनेत्रीने खास आजीसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने भावूक पोस्ट करताना, आजीसोबतच्या काही आठवणी सुद्धा शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्रीने काल रात्री उशिरा शेअर केली असून या पोस्टच्या माध्यमातून तिने आजीसोबतचं नातंही उलगडलं आहे.

अभिनेत्री शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणते, “माझ्या सर्वात खास आणि सर्वात लाडक्या मुलीसाठी ही पोस्ट, मला ठाऊक आहे, तू ९३ वर्ष जगलीस. तू सगळ्यांवर खूप खूप प्रेम केलं, तू कायमच आम्हाला सर्वांना एकत्र ठेवले आहेस!! घरातलं ते गोड हसू, तुझ्या डोळ्यातली खोडकर चमक, जुनी हळुवार मिठी, तू मला टेलिव्हिजन स्क्रिनवर किंवा चित्रपटामध्ये पाहिल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य यायचं!! ज्या मुलीला ९० दशकामध्ये चांगले कपडे घालायला आवडायचे. ती कायमच कशी दिसते याकडे खूप लक्ष द्यायची.”

आपल्या पोस्टमध्ये अभिज्ञा पुढे म्हणते, “तिचे गॉगल्स, साड्या, खाऊ, स्वयंपाकघर, क्रोशाचे काम यावर तिचं खूप प्रेम होतं!! सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मी माझ्या एका मोठ्या चाहत्याला मिस करेल, तो माझा चाहता नेहमीच माझ्याबद्दल पक्षपाती होता, आहे आणि राहील!! मी वचन देते की, ठाम मत व्यक्त करण्याचा तुझा स्वभाव, तुझी खेळकर वृत्ती, सर्वच पिढ्यांमध्ये सामावून जाण्याचा तुझा स्वभाव आणि गोष्टी स्वीकार करण्याची तुझी क्षमता मी जन्मभर पुढे नेत राहिल! कारण शेवटी ते आपल्या रक्तातच आहे.”

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये अभिनेत्री म्हणते, “मी कायमच तुला अभिमान वाटेल असे वचन देते, तुझ्या आठवणी मी आयुष्यभर माझ्या हृदयात साठवून ठेवणार आहे. तू होतीस, तूच आहेस आणि तू नेहमीच माझ्यासाठी खास व्यक्ती असेल. तू मला एक चांगली व्यक्ती आणि तुझ्यातील मुलाने मला एक चांगली आई बनवलं. एका तार्‍यासारखी कायमच तेजस्वीपणे चमकत राहा. माझी राजकुमारी प्रमिला भावे.” अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

SCROLL FOR NEXT