Amruta- Prasad 1st Kelvan: प्रसाद-अमृताचं पहिलं केळवण; नात आणि जावयाला ८७ वर्षांच्या आजोबांनी दिली अविस्मरणीय आठवण...

Amruta- Prasad Ukhana And Kelvan Video Viral: अमृता आणि प्रसाद यांचं पहिलं केळवण पार पडलं आहे.
Amruta- Prasad 1st Kelvan Video Post On Social Media
Amruta- Prasad 1st Kelvan Video Post On Social MediaInstagram
Published On

Amruta- Prasad 1st Kelvan Video Post On Social Media

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे, अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे होय. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या या जोडीच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्याही लव्हस्टोरीची तुफान चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या जोडीने गुपचूप साखरपुडा उरकत सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली होती. नुकतंच अमृता आणि प्रसाद यांचं पहिलं केळवण पार पडलं आहे. प्रसाद- अमृताचं हे पहिलं वहिलं केळवण तिच्या आजोबांनी (आईच्या वडीलांनी) केलं आहे. सध्या त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Amruta- Prasad 1st Kelvan Video Post On Social Media
Dream Girl 2 Box Office Collection: आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल-२'ची १०० कोटींकडे वाटचाल; नवव्या दिवशी कमाईत उसळी

अभिनेत्री अमृता देशमुखने शेअर केलेल्या फोटोमध्ये पारंपारिक लूक परिधान केलेला आहे. प्रसादने गोल्डन रंगाचा कुर्ता तर अमृताने सोनेरी रंगाची साडी परिधान केलीय. त्यावर तिने आपल्या लूकला साजेसे दागिनेही परिधान केले आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “पहिल्या केळवणासाठी तयार…”, अशा आशयाचं अभिनेत्रीने कॅप्शन दिले. आणि त्या पोस्टवर पुढे प्रसादला टॅग केलंय. नोव्हेंबर महिन्यात प्रसाद- अमृता लग्नगाठ बांधणार असून नुकतंच त्यांचं पहिलं केळवण पार पडलं. हे पहिलं केळवण अमृताच्या आजोबांनी केलं असून यावेळी सर्वच तिचे कुटुंबीय उपस्थित होते.

Amruta- Prasad 1st Kelvan Video Post On Social Media
Gadar 2 Success Party: सनी पाजीने करून दाखवलं..., ‘गदर २’ हिट होताच सक्सेस पार्टीचं दणक्यात आयोजन; पार्टीमध्ये बॉलिवूडची मांदियाळी
Amruta- Prasad 1st Kelvan Look
Amruta- Prasad 1st Kelvan LookInstagram

अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना व्हिडीओला कॅप्शन दिले की, “आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या 87 व्या वर्षी सगळं प्लॅनिंगकरून, भेटवस्तू, बुके ह्या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली. एवढं सगळं झाल्यावर मग “उखाणा घ्या” ह्या ऑर्डरला नाकारणार कसं...”

पहिला उखाणा अमृताने घेतला होता. अमृता म्हणते, “नाटकाच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलं केळवण”, नंतर प्रसादने सुद्धा उखाणा घेतला. तो म्हणतो, “कितीही वणवण फिरलीस तरी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी.” सध्या दोघांचेही उखाणे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

२२ जुलै रोजी या जोडीने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्यांनी एंगेजमेंटचे फोटोशूट देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. “आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत”, अशी हटके कॅप्शन अमृता देशमुखने पोस्टला दिली होती. सोबतच अभिनेत्रीने लग्नाची तारीख ही जाहीर केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला प्रसाद- अमृता लग्नबंधनात अडकणार असल्याचेही जाहीर केले आहे.. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com