Kushal Badrike Emotional Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Video : कुशल बद्रिकेला पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते?, किस्सा सांगताना अभिनेता झाला भावुक

Kushal Badrike Emotional Video : अभिनेता कुशल बद्रिकेने 'मॅडनेस मचायेंगे'च्या स्टेजवर त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सांगताना अभिनेता भावुक झाला आहे.

Chetan Bodke

मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या अभिनय आणि कॉमेडीच्या जोरावर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळख प्रस्थापित केली आहे. कुशलला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला कुशल सध्या 'मॅडनेस मचायेंगे' मुळे चर्चेत आला आहे. काही तासांपूर्वीच कुशलने एक व्हिडीओ शेअर केली आहे, त्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सांगताना अभिनेता भावुक झाला आहे.

कुशल सध्या 'मॅडनेस मचायेंगे' या कॉमेडी शोमधून चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. या शोमध्ये हुमा कुरेशीने कुशलला त्याच्या आयुष्यातील पहिला चित्रपट कोणता असा प्रश्न विचारला होता. यावेळी त्याने सांगितलं की, "माझा पहिला चित्रपट 'जत्रा' होता. हा चित्रपट आम्ही २००५ मध्ये शुट केला होता. चित्रपटाच्या पेमेंटबद्दल जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा मला निर्मात्यांनी ३००० रुपये पर डे पगार सांगितला होता. ३० दिवसांची शुटिंग होती आणि चित्रपटात माझा मोठा रोल होता. त्यामुळे मी आनंदित झालो."

"चित्रपटाच्या पगाराबद्दल बोलणं झालं तेव्हा मला ३००० रुपये पर डे पगार सांगितला होता. दिवसाचे ३००० रुपये बोलले तर, महिन्याचे ९०,००० रुपये माझे होतील. २००५ मध्ये ९०,००० रुपये मिळणार म्हणून मी आनंदित झालो होतो. तुम्ही सर्व नियम वाचले का ?, व्यवस्थित डॉक्यूमेंट वाचले का ? असा मला प्रश्न विचारल्यावर मी त्यांना हो म्हणालो. तर ते मला म्हणाले की, तुला ३००० रुपये दिवसाला नाही तर, महिन्याला मिळणार आहेत. इतके कमी पैसे मिळणार म्हणून मी थोडा नरवस झालो, पण मला माझ्या मित्राने चित्रपटात काम करायला सांगितलं. अखेर चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली."

"पहिल्या शेड्यूल्डनंतर माझ्या वडिलांचं निधन झालं. माझा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी आणि माझी आई चित्रपट पाहायला गेलो होतो. इंटर्व्हलवेळी मी सहज मागे वळून पाहिलं तर माझी आई वडिलांचा फोटो घेऊन चित्रपट पाहत होती. माझ्या आईने चित्रपट मागच्या सीटवर बसून पाहिला. मोठ्या स्क्रिनवर माझं नाव पाहून मला प्रचंड आनंद झाला." दरम्यान हा किस्सा सांगताना कुशल प्रचंड भावूक झाला. यावेळी त्याने 'जत्रा २' येण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

कुशलने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "ही गोष्ट मी कधीच कुठे share केली नव्हती; म्हणजे तसं काही जुळूनच आलं नाही कधी. आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. नाही का ? पहिलं प्रेम, पहिली नोकरी, पहिली गाडी, पहिलं घर…. तसंच ही माझी माझी “पहिली फिल्म” जत्रा ! केदार सर तुम्ही संधी दिलीत आणि आयुष्याचं सोनं झालं. (आता सोनी झाली असं म्हणायला हरकत नाही.) भरत दादा तुम्ही कायम संभाळून घेतलंत. बाकी मोन्या, सिध्दू, संज्या, रम्या, गण्या ह्यांना सांगू नका हां, माझं नाव कुश्या आहे ते." अभिनेत्याची ही व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक केलं आहे. १६ हजाराहून अधिक चाहत्यांनी व्हिडीओला लाईक्स केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT