Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding Photos: “आमचं झालंय!”, प्रथमेश- मुग्धाने पारंपारिक पद्धतीत बांधली लग्नगाठ; दोघांच्याही पेशवाई लूकने वेधले साऱ्यांचेच लक्ष

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding: 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन गुरुवारी (२१ डिसेंबर)ला लग्नगाठ बांधली. नुकतंच मुग्धाने लग्नातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Chetan Bodke

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding Photos

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Li'l Champs) फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) गुरुवारी (२१ डिसेंबर)ला लग्नगाठ बांधली. चिपळूणमध्ये पारंपारिक पद्धतीने दोघांचेही लग्न पार पडले. कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांचे सेलिब्रिटी मित्र यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. नुकतंच मुग्धाने लग्नातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जुन २०२३ मध्ये, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने 'आमचं ठरलंय' म्हणत प्रेमाची कबुली दिली होती. दोघांनीही प्रेमाची कबुली दिल्यानंतर, २१ डिसेंबरला या कपलचा चिपळूणमध्ये अगदी साध्या पद्धतीने आणि मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.

दोघेही लग्नामध्ये खूपच आनंदीत होते. लग्नामध्ये प्रथमेश आणि मुग्धा दोघेही खूपच क्युट दिसत होते. मुग्धाने पिवळ्या रंगाची नववारी साडी आणि प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी घातली होती.

मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा होत आहे. हे फोटो शेअर करताना त्यांनी “आमचं झालंय!” असं कॅप्शन दिलं आहे. (Social Media)

मुग्धा-प्रथमेशची ही लग्नानंतरची पहिलीच पोस्ट असून शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या लग्नाच्या वेळी दोघांचेही कुटुंबीय आणि मित्र परिवाराने धम्माल केली. प्रथमेश आणि मुग्धाच्या लग्नसोहळ्यातले अनेक फोटो, व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. (Marathi Actors)

काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि मुग्धा यांनी आपआपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी 'वाङ्निश्चय' असं लिहिलं होतं. हे फोटो पाहून दोघांनीही गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. (Marathi Actress)

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर ओळख होऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार निवडणारी प्रथमेश आणि मुग्धा ही दुसरी जोडी आहे. यापूर्वी रोहित आणि जुईली यांची या शोच्या मंचावर भेट झाली. आधी मैत्री नंतर प्रेम असं करत दोघांनी लग्न केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT