Marathi Serial  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत दिसणार भगवान शंकराचे पंचानन महादेव रूप, पाहा 'महाशिवरात्री'चा विशेष भाग

Jai Jai Swami Samarth- Aai Tuljabhavani : 'जय जय स्वामी समर्थ' आणि 'आई तुळजाभवानी' मालिकेचे महाशिवरात्री विशेष भाग अधिक मनोरंजक ठरणार आहेत. मालिकांचे अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) आणि 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग दाखवले जाणार आहे. प्रत्येक माणसात देव असतो त्याला नाकारू नका, हा माणुसकीची शिकवण देणारा संदेश यंदाच्या 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील महाशिवरात्री विशेष सप्ताहाचा महत्त्वाचा पैलू आहे. देवी पार्वती अक्कलकोटात एक सामान्य स्त्री म्हणून राहू लागते.

रोजचे जीवन जगण्यासाठी मदत मागू लागते. तिला गावकऱ्यांनी मदत करावी म्हणून स्वामी त्यांना भेटून प्रेरित करत आहेत पण महाशिवरात्रीच्या उत्सवात महादेवाकडून खूप काही मिळवण्याच्या धुंदीत असलेला प्रत्येक गावकरी फक्त उत्सव साजरा करण्यात मग्न आहे. त्या गरीब सामान्य स्त्रीला कोणीही मदत करत नाही.

माणसातली माणुसकी हरवलेली पाहून देवी पार्वती व्यथित होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ती सामान्य गरीब स्त्री, देवी पार्वतीमध्ये रूपांतरित होते. तिचा क्रोध अनावर होतो. तिचा राग शांत करण्यासाठी स्वामी महादेव रुपात प्रकटतात. आता वेळ आहे परिणामांची आणि आपण दोघांनी मिळून शिकवण देण्याची असे शिवपार्वती ठरवतात. इथे मंदिरातले शिवलिंग गायब होते. शिवलिंग परत मिळवण्याची माणुसकीचा मंत्र शिकवणारी दिव्य स्वामी लीला महाशिवरात्री भागात पाहायला मिळणार आहे.

'आई तुळजाभवानी' या मालिकेत महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडली आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता. आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय? याचा खुलासा हळूहळू मालिकेत होईलच. पण, महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराचे पंचानन महादेव रूप भक्तांना पाहायला मिळणार आहे.

'आई तुळजाभवानी' अवतारात असलेल्या देवी पार्वतीला महादेवांच्या भवानीशंकर रूपाची ओळख पटते. बालगणेश, अशोकसुंदरी हे कुटुंब एकत्र येते. देवी पार्वती महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवांची मनोभावे पूजा करते. देवी पार्वती म्हणते आई तुळजाभवानी अवतारात मी माझे वचन पूर्ण केले आहे. आता महादेव तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा.

महादेवांनी देवींना कोणते वचन दिले, ते 'पंचानन महादेव रूपात' का प्रकट झाले हे आपल्याला महाशिवरात्री भागात पाहायला मिळणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिका रात्री ८ वाजता आणि 'आई तुळजाभवानी' मालिका रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT