TRP Rating Of Marathi Tv Serial 30th December To 05th January Saam Tv
मनोरंजन बातम्या

TRP Rating Of Marathi Serial: टीआरपीच्या शर्यतीतून अरुंधतीची 'आई कुठे काय...' मालिका गायब, ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ चुरशीची लढत

Marathi Serial TRP Report: टेलिव्हिजन सिरियल चॅनेलचा लेटेस्ट TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. २०२४ मधील पहिल्याच आठवड्यातला TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे.

Chetan Bodke

TRP Rating Of Marathi Tv Serial 30th December To 05th January

टेलिव्हिजन सिरियल चॅनेलचा लेटेस्ट TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. २०२४ मधील पहिल्याच आठवड्यातला TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. हा TRP रिपोर्ट 'मराठी टेलिबझ ऑफिशियल' या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. टीआरपीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ या मालिकेनेच बाजी मारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका सतत पहिल्या क्रमांकावरच असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘प्रेमाची गोष्ट’ही मालिका आहे. (Tv Serial)

‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु होऊन बरेच दिवस झाले आहेत. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर नवनवे ट्विस्ट अनुभवायला मिळत आहे. मालिकेमध्ये येणाऱ्या नवनव्या ट्विस्टमुळे या मालिका टीआरपीच्या शर्यतीत टॉप १ आणि टॉप २ ला कायम राहिली. प्रदर्शित झाल्यापासून अनेक सिरियल्सला मागे सारत, या मालिकेने टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर स्वत:चे नाव कोरलेय. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली असून पती-पत्नीची एक वेगळीच लव्ह स्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. (Marathi Film)

तर दुसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आहे. या मालिकेला ६.६ रेटिंग मिळाले असून मुक्ता- सागरच्या लव्हस्टोरीची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून सध्या मालिकेला नवा ट्रॅक मिळालेला आहे. तर तिसऱ्या स्थानावर स्वरा आणि मल्हारची ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आहे. या मालिकेच्या टीआरपी पॉईंट्स मध्ये सातत्याने आपल्याला बदल पाहायला मिळत आहे. या मालिकेला ६.३ रेटिंग मिळाले आहे. सध्या स्टार प्रवाहावरील अनेक मालिकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. (Entertainment News)

तर एकेकाळी टीआरपी चार्टमध्ये टॉपला असलेली अरुंधतीची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता थेट पाचव्या क्रमांकावरच आली आहे. ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टॉप ५ मध्येच पाहायला मिळत आहे. या मालिकेला सध्या ६ इतके रेटिंग मिळाले आहे. पुढे अनुक्रमे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिका टॉप १० मध्ये आहेत. (Star Pravah)

टॉप १५ मध्ये सर्वच स्टार प्रवाहवरील मालिका असून १४ व्या क्रमांकावर झी मराठीवरील ‘तुला शिकविनच चांगला धडा’ही मालिका पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळतोय. (Zee Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT