Janata Raja: ‘जाणता राजा’ महानाट्याचा आज प्रयोग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

Nagpur News: ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याच्या राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी ५.३० वाजता येथील यशंवत स्टेडियमवर होणार आहे.
Janata Raja
Janata RajaSaam Tv
Published On

Nagpur News:

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याच्या राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या नाटकाचा प्रयोग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ५.३० वाजता येथील यशंवत स्टेडियमवर होणार आहे. नागपुरातील ७० कलाकार यात सहभागी होणार आहेत. शहरात आतापर्यंतचा या महानाट्याचा ६वा प्रयोग असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमीत्याने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगातील हा पहिला प्रयोग आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरात “जाणता राजा” या ऐतिहासिक महानाट्याचा जवळपास ६वा प्रयोग होणार आहे. वर्ष १९९२ मध्ये शिव कथाकार विजयराव देशमुख यांच्या पुढाकाराने या महानाट्याचा प्रयोग घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५०व्या वर्षानिमित्त आयोजित या महानाट्यामध्ये २०० पेक्षा अधिक कलाकार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.नागपूरातील १४४ वा प्रयोग असणार. राणी सईबाई, कान्होजी जेथे, तानाजी मालुसरे, अष्टप्रधान बाल शिवाजी आदींमध्ये नागपूरकर कलाकार दिसणार आहेत.  (Latest Marathi News)

१९८५ साली पुण्यात या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. आतापर्यंत महाराष्ट्राशिवाय अमेरिका, इंग्लंड या देशांसह भारतातील एकूण ११ राज्यांमध्ये ११४३ प्रयोग झाले आहेत.

Janata Raja
India Alliance च्या अध्यक्षपदी खरगे? नितीश कुमार संयोजकपदी, आजच्या बैठकीत काय झाली चर्चा?
Janata Raja
Shivrayancha Chhava Poster: बलदंड शरीरयष्टी, करडी नजर अन् जबरदस्त आत्मविश्वास; 'शिवरायांचा छावा'तील छत्रपती संभाजी महाराजांचे चित्तथरारक पोस्टर भेटीला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेचा घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह प्रसंगानुरूप फिरत्या रंगमंचा समोर घोडे आणि उंटाहून जाणारा लवाजमा. तसेच, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी बघायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com