Marathi Serial Off Air SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial Off Air : 'आई कुठे...' नंतर 'ही' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, ४ वर्षांचा प्रवास अखेर थांबणार

Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'आई कुठे काय करते' मालिका संपल्यानंतर आता 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

Shreya Maskar

अलिकडेच 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक वर्ष मनोरंजन केले. आता 'आई कुठे काय करते' मालिकेच्या पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने तब्बल 4 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेचे नुकतेच शूटिंग संपले आहे. मालिकेशच्या शेवटच्या दिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील खूप गाजलेली मालिका आहे.

जयदीप आणि गौरीच्या या खास गोष्टीने प्रेक्षकांना भुरळ घातली. खूप कमी वेळात ही मालिका खूप लोकप्रिय झाली. सेलिब्रेशनच्या व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार महेश कोठारे यांच्यासोबत केक कापताना पाहायला मिळत आहे. जयदीप आणि गौरीची ही शेवटची भेट असल्यामुळे काही चाहते देखील नाराज असल्याचे पाहायला मिळत आहेत.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही भन्नाट मालिका 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांनी केली आहे. ही मालिकेचा टीआरपी सुरुवातीपासूनच सुसाट होता. स्टार प्रवाह वाहिनीवर एकीकडे प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका निरोप घेत आहेत. तर दुसरीकडे नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सुरु झाल्या आहेत. यात तु ही रे माझा मितवा, लग्नानंतर होईलच प्रेम आणि आईबाबा रिटायर होत आहेत या नवीन मालिकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT