Premachi Goshta Serial Latest Update Instagram
मनोरंजन बातम्या

Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या नात्यामध्ये येणार नवा ट्वीस्ट; ‘प्रेमाची गोष्ट’चा नवा प्रोमो पाहिलात का?

Premachi Goshta Promo: मराठी टेलिव्हिजनवरील प्रेमाची गोष्ट ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या मुक्ता कुटुंबियांशी खोट बोलून स्वातीला मदत करताना दिसत आहे. त्यामुळे मुक्ताचे खोटे बोलणे सर्वांसमोर उघड होणार असल्याचे नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Premachi Goshta Serial Latest Promo:

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट. स्टार प्रवाहवरील ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. मालिकेतील मुक्ता आणि सागरची केमिस्ट्री प्रेक्षक आवर्जुन पाहतात. मालिकेमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. मालिकेत आता लवकरच मुक्ताचे खोटे बोलणे सर्वांसमोर उघड होणार असल्याचे दिसत आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेत सईसाठी सागर आणि मुक्ताने लग्न केले आहे. परंतु त्यांच्या या नात्यात नेहमीच काही न काही गैरसमज होताना दिसत आहे. मालिकेत नुकताच सागरचा मुलगा आदित्यचा वाढदिवस साजरा होताना दिसत आहे. त्यानंतर आता घरातील दागिने गायब झाल्याने मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (Latest News)

मालिकेचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये सागरची आई इंद्रा मुक्ताचा घराबाहेर काढताना दिसत आहे. त्यावेळी इंद्रा म्हणते की, आज बाहेरच्यांना दागिने दिले. उद्या संपूर्ण घर विकून खाशील. त्यानंतर मुक्ताची बॅग घरातून फेकून देते. त्यावेळी सागर येतो आणि मुक्ताला घरात घेऊन येतो. यानंतर सागर मुक्ताला जाब विचारताना दिसत आहे, इतर वेळी नको तेव्हा खूप जास्त बोलता. आता गरज आहे तेव्हा गप्प बसलात. आज यांनी आपल्या घरची इज्जत वाचवली. त्यामुळे या घरची सून घराबाहेर जाणार नाही, असे सागर म्हणतो.

मालिकेत मुक्ता सध्या सागरची बहिण स्वातीला पैशाची मदत करताना दिसत आहे. त्यासाठी तिने घरातील दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट घरात इतर कोणालाच माहित नाही आहे. त्यामुळे घरातील दागिने चोरीला गेल्याने सर्वज चिंतेत दिसत आहे. मुक्ताच्या सासूने मुक्तावर आरोप लावत तिला घराबाहेर काढले आहे. मात्र, सागर तिला पुन्हा घरात घेऊन येतो. त्यामुळे मालिकेत नक्की कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सागर- मुक्ताच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा येणार? मुक्ता हे सर्व कोणासाठी करतेय हे सागरला समजले का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. येत्या काही भागात मालिकेत सागर-मुक्ताच्या नात्यात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT