Lai Avadtes Tu Mala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lai Avadtes Tu Mala : सईनं केला सरकारवर गंभीर आरोप, सानिका कशी नवऱ्याला निर्दोष सिद्ध करणार?

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सरकारवर सईने गंभीर आरोप केला आहे. आता सानिका काय करणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Shreya Maskar

'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala ) दिवसेंदिवस लोकप्रिय होत जात आहे. प्रत्येक आठवड्याला मालिकेत नवे वळण पाहायला मिळत आहे. 'लय आवडतेस तू मला'मालिकेत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरकार आणि सानिकाचे विधीवत लग्न तसेच सईचे लग्न ठरणार असताना ट्विस्ट समोर आला आहे.

सईला हे लग्न मोडायचे असल्याने ती एक प्लान करते. तिला एका शेजारणीचा किस्सा समजतो आणि त्यावरून ती सरकारला रंगपंचमीच्या दिवशी काही आठवतंय का याची चाचपणी करते. मात्र, सरकारला काहीही आठवत नसल्याचे पाहून ती ही संधी साधण्याचा निर्णय घेते आणि ठामपणे म्हणते की, "आता दोन्ही लग्नं मोडणार!"

सईचा गोंधळलेला अवतार पाहून आप्पा तिला काय झाले विचारतात. पण ती टाळाटाळ करते. अखेर सततच्या चौकशीनंतर ती धक्कादायक खुलासा करते ती म्हणते, "सरकारने नशेत मला सानिका समजून माझ्यावर हात टाकला" या आरोपाने घरात खळबळ माजते. दुसरीकडे सानिका मंगळसूत्र खरेदी करत असताना अचानक अपशकुन घडतो. ज्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होते.

सईचा आरोप ऐकताच आप्पा संतप्त होऊन सरकारला खेचून बाहेर आणतात आणि पोलिसांत तक्रार करण्याचा आग्रह धरतात. मात्र, कमलला यावर विश्वास बसत नाही आणि ती त्यांना रोखते. आप्पा सरकारवर सईने केलेल्या गंभीर आरोपांबाबत स्पष्ट बोलतात. यावरून वाद निर्माण होतो. खंबीरपणे सानिका सरकारच्या पाठीशी उभी रहाते. तिला सरकारवर पूर्ण विश्वास आहे, की तो असे कधीच वागणार नाही. सानिका सरकारची बाजू घेत सईकडे पुरावा मागते आणि तिच्यावर खोटे बोलण्याचा आरोप करते.

आता सरकार आणि सानिका एक प्लान करतात. यामुळे सईची खोटी खेळी कशी उघड होईल, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. आता हे सगळं सईला कळताच ती सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी थेट विहिरीत उडी मारते. 'लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार दोषी ठरेल की सानिका त्याला निर्दोष सिद्ध करेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'लय आवडतेस तू मला' ही मालिका कलर्स मराठीवर रात्री ९.३० वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT