Adrishyam 2 The Invisible Heroes
Adrishyam 2 TrailerSAAM TV

Adrishyam 2 Trailer : अखेर प्रतीक्षा संपली! जबरदस्त ॲक्शन अन् सस्पेन्स, 'अदृश्यम २' चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

Adrishyam 2 The Invisible Heroes : बहुप्रतिक्षित 'अदृश्यम-2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही ॲक्शन सीरिज आहे.
Published on

'अदृश्यम-2' चा (Adrishyam 2 The Invisible Heroes) धमाकेदार ट्रेलर (Adrishyam 2 Trailer ) रिलीज झाला आहे. ही ॲक्शन सीरिज आहे. त्यामुळे यात अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे. 'अदृश्यम-2' 4 एप्रिलपासून प्रदर्शित होणारा आहे. यात खिळवून ठेवणारे ट्विस्ट्स आणि अज्ञात शत्रूंविरूद्ध सामना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एक नवीन चेहरा येत आहे. तो म्हणजे अभिनेत्री पूजा गोर. ती ऑफिसर दुर्गाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार असून त्यामुळे मिशनमध्ये एक नवीन ऊर्जा येईल.

रवी वर्माची भूमिका साकारणारा एजाज खान (Eijaz Khan) म्हणाला की, "अदृश्यम २ हा अधिक मोठा, साहसी आणि रोमांचक आहे. या सीझनमध्ये रवी एकटा लढत नाही आहे. त्याच्यासोबत पूजा गोरने साकारलेली एक गुप्तहेर एजंट दुर्गा आहे. जी युद्धभूमीवर एक नवीन दृष्टीकोन घेऊन येते. आम्ही एकत्र येऊन पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक शत्रूंचा सामना करत आहोत. तुम्हाला सीझन १ रोमांचक वाटला असेल तर दुसरा सीझन त्याहीपेक्षा बरेच काही देणारा आहे."

'अदृश्यम-2' शोबद्दलचा बोलताना दुर्गाच्या भूमिकेत असलेली पूजा गोर (Pooja Gor) म्हणाली की, "ही भूमिका मी यापूर्वी केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे. माझे पात्र फक्त एक अधिकारी नाही तर ती एक अथांग शक्ती आहे. ती आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी लढण्यास, पाठलाग आणि त्याग करण्यास तयार आहे. तिच्यासमोरील आव्हाने प्रखर आहेत. ती तिची परीक्षा पाहतात. परंतु ती कधीही मागे हटत नाही. 'अदृश्यम-2' हा एक अत्यंत रोमांचक अनुभव आहे"

'अदृश्यम-2 द इनव्हिजिबल हिरोज' ही सीरिज गुप्तपणे काम करणाऱ्या एका गुप्तहेरांच्या टीमवर आधारित आहे. ते धोक्यांवर हल्ला करण्याऐवजी ते होऊच नयेत यासाठी प्रयत्न करतात. ही सीरिज पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. 'अदृश्यम-2 ही सीरिज सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.

Adrishyam 2 The Invisible Heroes
Shihan Hussaini Death: अभिनेते अन् कराटे मास्टर शिहान हुसैनी यांचे निधन, कर्करोगाशी देत होते झुंज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com