Jai Jai Swami Samarth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jai Jai Swami Samarth : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत उघड होणार अवंतीचं धक्कादायक सत्य, पाहा VIDEO

Jai Jai Swami Samarth Serial Update : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अवंतीचं धक्कादायक सत्य दुष्यंत समोर येणार आहे.

Shreya Maskar

'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपून मनोरंजन करत आहे. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये येत्या आठवडयात अवंतीचं धक्कादायक सत्यउघड होणार आहे. अवंती दगडधोंड्यांची पर्वा न करता बेभान पावलं टाकत दुष्यंतपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा पाठलाग दुष्यंत करत आहे, कारण त्याला अवंतीशी लग्न करायचे आहे. दुष्यंत अवंतीला विचारतो की, तू माझ्यासोबत लग्नाला का नाही म्हणतेस? मात्र यावर अवंती मौन बाळगते.

दुष्यंत आणि अवंतीचा संवाद सुरू असताना तेथे अचानक स्वामी प्रकट होतात आणि म्हणतात, "किती पळशील? आज नाही उद्या सत्याचा सामना तुला करायचाच आहे," असं म्हणत ते हातातील काडी मोडतात. अवंतीच्या पायात मोठा काटा टोचतो. दुष्यंत तिचा सांभाळ करताच ती ठामपणे सांगते, "नाही होऊ शकत आपला विवाह…कारण मी बालविधवा आहे." या विधानाने दुष्यंत हादरतो. स्वामी प्रकट होऊन त्यालाही सत्याचा सामना करण्याचा इशारा देतात.

अत्यंत महत्त्वाचे विषय दाखविण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जात आहे. बालविधवा आणि तिचा पुन्हा विवाह हा त्या काळात मान्य नव्हता. पण स्वामी समर्थ यामध्ये अवंतीची साथ देऊन तिला आणि दुष्यंतला कसा मार्ग दाखवणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Symptoms: लिव्हर खराब झाल्यावर शरीर तुम्हाला देतं हे 5 संकेत; शेवटचं लक्षणं जाणून व्हाल हैराण

Fact Check: सिराजचं क्रिकेटच्या मैदानात नमाज पठण? कोहली, रोहित,गिलने बनवला व्हिडिओ?

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला २० फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

Exim Bank Recruitment: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती; आजच करा अर्ज

Western Railway : मुंबईकरांना दिलासा! विरार लोकल आणखी सुसाट धावणार, पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं काम पूर्ण, वाचा

SCROLL FOR NEXT