Devmanus New Promo  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Devmanus New Promo : "मी बाईचे कपडे शिवतो...", अंगावर काटा आणणारा 'देवमाणूस 3'चा प्रोमो पाहिलात का? VIDEO पाहून झोप उडेल

kiran Gaikwad-Devmanus : अभिनेता किरण गायकवाड लवकरच 'देवमाणूस 3' मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा थरारक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

Shreya Maskar

मराठमोळा अभिनेता किरण गायकवाडला 'देवमाणूस' मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या मालिकेचा थरारक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये किरण गायकवाडचे भयानक रुप पाहायला मिळत आहे. प्रोमो मालिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

'झी मराठी'ने 'देवमाणूस' मालिकेचा हटके प्रोमो शेअर करून त्याला जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "भल्याभल्यांची झोप उडवायला, देवमाणूस येतोय 'माप' घ्यायला..." या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'हिम्मतराव लेडीज टेलर' बाहेर महिलांची कपडे शिवण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच महिला टेलरची म्हणजेच 'देवमाणूस' चे कौतुक करत आहेत.

'देवमाणूस' एका नव्या गावात टेलर बनून येतो. तो येथे 'हिम्मतराव लेडीज टेलर' नावाने टेलरिंगचे दुकान चालवत आहे. आपल्या शिवण कौशल्याने त्याने महिलांना वेड लावले आहे. त्याच्या दुकानाबाहेर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र 'देवमाणूस' च्या डोळ्यात एक वेगळीच आग पाहायला मिळत आहे. प्रोमोमधील 'देवमाणूस' म्हणतो की, "मी बाईचे कपडे शिवतो, मी बाईला शिवत नाही...पाप लागेल मला परक्या बाईकडे असं वाकड्या नजरेनं बघितलं तर...तो वरचा सगळं बघतोय..."

प्रोमोच्या शेवटी कपाटावर एका महिलेचा मृतदेह पाहायला मिळतो. अशा थरारक प्रोमोने प्रेक्षकांची झोप उडवली आहे. हा 'देवमाणूस' मालिकेचा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. मालिकेतील 'देवमाणूस' म्हणजे किरण गायकवाडने आपल्या भूमिकेने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT