Marathi Serial Bhago Mohan Pyare Fame Sarita Mehendale Baby Shower Photoshoot Sarita Mehendale Baby Shower Photoshoot- Saam tv
मनोरंजन बातम्या

Sarita Mehendale: 'भागो मोहन प्यारे' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत म्हणते -'कुणीतरी येणार येणार गं'

Sarita Mehendale Baby Shower Photoshoot: डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सरिताने आई होणार असल्याची गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

Priya More

Bhago Mohan Pyare Serial:

'भागो मोहन प्यारे' (Bhago Mohan Pyare) या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री सरिता मेहेंदळेच्या (Actress Sarita Mehendale) घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सरिता आई होणार आहे. डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सरिताने आई होणार असल्याची गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. सरिताच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सरिता मेहेंदळेने नुकताच आई होणार असल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. अभिनेत्री आई होणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सरिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. सरिताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत आई होणार असल्याची घोषणा केली. सरिताने पती सौरभ जोशीसोबत डोहाळे जेवणाचे खास फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

सरिताने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत बेबी बंप फ्लॉन्ट केला. तिने या फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाची आणि गुलाबी काठ असलेली सुंदर साडी नेसली आहे. फुलांचे दागिने घालून तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे. तर तिचा पती सौरभने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या फोटोमध्ये सरिता आणि सौरभ यांच्या चेहऱ्यावर आई-बाबा होणार असल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

सरिताने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'We’re adding a new little pumpkin to our patch!' असे लिहिले आहे. या कॅप्शनसोबत तिने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. त्याचसोबत तिने 'कुणीतरी येणार येणार गं' हा हॅशटॅग टाकला आहे. दरम्यान, सरिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण 'भागो मोहन प्यारे'या मालिकेतील मधुवंती या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालितून ती घराघरामध्ये पोहचली. सरिताने 'सरस्वती' या मालिकेतून आपल्या मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT