Diwali 2023: गायीच्या शेणापासून बनवली पणती आणि धुपबत्ती; आदिवासी महिलांचा पर्यावरणपूरक व्यवसाय

Environmentally Friendly Business: आदिवासी कुटुंबाचं स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात असून आपल्याच गावात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
Diwali 2023
Diwali 2023Saam TV
Published On

Diwali Panti:

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात विविध प्रकारच्या मातीच्या पणती विक्रीसाठी दाखल झाल्यात. मात्र सध्या या दिवाळीला बाजारात सर्वाधिक मागणी आहे, ती आदिवासी महिलांनी आपल्या हाताने तयार केलेल्या पणतीला. त्यांनी गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या तयार केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Diwali 2023
Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या; पक्षाचा प्रचार करून परतताना नक्षलवाद्यांनी केली निर्घृण हत्या

नंदूरबार जिल्ह्यातील रोजगार अभावी अनेक आदिवासी कुटुंब हे आपल्या रोजगारासाठी गुजरात तसेच इतर राज्यात स्थलांतरित होत असतात. आदिवासी कुटुंबाचं स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात असून आपल्याच गावात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील वाण्याविहिर या गावातील आदिवासी महिलांना एकत्रित करून त्यांचा बचत गट तयार करण्यात आलाय. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून गावातील ४४ महिलांना गायीच्या शेणापासून विविध प्रकारचे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

गायीचं शेण एकत्रित करत त्यात माती आणि इतर वस्तू मिसळून साचा आणि हाताच्या सहाय्याने विविध प्रकारच्या पणत्या तयार केल्या जात आहेत. कमी वेळेत आणि कमी खर्चात या सुंदर पणत्या तयार होतात या सोबतच या आदिवासी महिला मेनापासून विविध प्रकारच्या आकर्षक मेणबत्या आणि दिवे, धुपबत्ती, हवन गौऱ्या, धूप कांडी इतर अनेक वस्तू बनवून त्याची योग्य पद्धतीने पॅकेजिंग करून विक्री करत आहेत.

शेणापासून तयार केलेल्या पणती आणि इतर वस्तुंना बाजारपेठेत मोठी मागणी असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जास्त संख्येने पणत्या बनवण्याचे काम या महिला करतायत. त्यामुळे या आदिवासी महिलांना आता चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

Diwali 2023
Chalisgaon Crime News: गाडी दुरुस्तीवरून वाद; गॅरेज चालकाचा जमिनीवर आपटून खून

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com