Chalisgaon Crime News: गाडी दुरुस्तीवरून वाद; गॅरेज चालकाचा जमिनीवर आपटून खून

Jalgaon News : संशयित ज्ञानेश्वर निंबा मासरे याची दुचाकी दुरुस्त करून दिली होती. मात्र, ती पुन्हा खराब झाल्यामुळे ज्ञानेश्वर शनिवारी सायंकाळी दारू पिऊन दुचाकी घेऊन गॅरेजवर आला
Chalisgaon Crime News
Chalisgaon Crime NewsSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावलेली दुचाकी लगेच दुरुस्ती करण्याच्या कारणावरून (Chalisgaon) झालेल्या वादातून बहाळ (ता. चाळीसगाव) येथे दुचाकी चालकाने गॅरेजचालकाचा खून केला. महेश बोरसे (वय २५) असे खून (Crime News) झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. (Live Marathi News)

Chalisgaon Crime News
BRS Party: भंडारा जिल्ह्यात गुलाबी वादळ; भाजपाला जबर धक्का

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील महेश संतोष बोरसे-कुंभार (वय २४) हा आई- वडील व बहिणीसोबत वास्तव्यास होता. त्याचे बसस्थानकाजवळ ऑटो गॅरेज आहे. दरम्यान शनिवारी संशयित ज्ञानेश्वर निंबा मासरे याची दुचाकी दुरुस्त करून दिली होती. मात्र, ती पुन्हा खराब झाल्यामुळे ज्ञानेश्वर शनिवारी सायंकाळी दारू पिऊन दुचाकी घेऊन गॅरेजवर आला. त्या वेळी महेश दुसऱ्या गाडीची दुरुस्ती करीत होता. महेशने ज्ञानेश्वरला ‘थोडं थांबा, ही गाडी झाल्यावर तुमच्या गाडीचे काम करून देतो’ असे सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chalisgaon Crime News
Jalna News: जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध; कट्टर विरोध आले एकत्र

उचलून जमिनीवर आपटले 

दुचाकी लगेच दुरुस्त करून देत नसल्याचा ज्ञानेश्वरला राग आला. यात त्याने महेशला उचलले आणि जमिनीवर जोरात आपटले. यात महेशच्या डोक्याला गंभीर मार लागला. महेशच्या वडिलांनी त्याला जाब विचारला असता, त्यांनाही त्याने शिवीगाळ केली. आजूबाजूच्या लोकांनी जखमी महेशला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना (Police) समजताच घटनास्थळी दाखल झाले. घटनेची कुटुंबीयांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वर मासरे याचा तपास केला असता तो फरार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com