'अशोक मा.मा.' (Ashok Ma. Ma) मालिकेत आता नवीन अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मालिकेने आता नवीन वळण घेतले आहे. भैरवीचा जुना मित्र अर्जुन बेलवलकर तिचा बॉस म्हणून मालिकेत आला आहे. आत्तापर्यंत घरात 'मामा' बॉस होते, पण आता ऑफिसमध्ये भैरवी बॉस आहे. आता अर्जुनच्या येण्याने कोणता नवा पेच उभा राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अनिश आणि भैरवीचं नातं सुधारत असतानाच त्यांच्या आयुष्यात अर्जुनची एन्ट्री झाली आहे. आता यांच्या नात्याला कुठलं नवं वळण येणार? हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिका आता घरातील आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्यांचा तिढा, गोड गैरसमज आणि भांडणं या सगळ्यावर अर्जुन उपाय काढणार आहे.
अनिशच्या बोलावण्यावर भैरवी सेलिब्रेशनसाठी लवकर घरी येते आणि तिच्यासोबत अर्जुनदेखील घरी येतो. मात्र अशोक मामा अनुपस्थित राहतात आणि हे अनिशच्या मनाला खटकते. भैरवीला घरी पाठवून स्वतः ऑफिसमध्ये थांबलेले अशोक मामा, तर दुसरीकडे भैरवीला ऑफिसच्या जबाबदाऱ्यांतून मोकळीक हवी असल्याचं अनिशला वाटते आहे. या सगळ्यात राधा मात्र अनिशला भडकवण्याची एकही संधी सोडत नाही.
भैरवीला आलेला अर्जुनचा फोन नेमका अनिश ऐकतो आणि यामधून त्याला संशय यायला सुरुवात होते. इरा आणि ईशान अर्जुनसोबत फनफेअरमधल्या धमाल गोष्टी सांगत असताना अनिश मात्र भैरवी ऑफिसला पोहोचली की नाही? हे जाणून घेण्यासाठी आधी मामा आणि नंतर थेट भैरवीलाच कॉल करतो. दरम्यान, अर्जुन आणि भैरवी एकत्र चहा ब्रेकवर जातात.
अर्जुनचा आत्मविश्वास, प्रेमळ स्वभाव आणि सगळ्यांकडून मिळणारी प्रशंसा यामुळे ऑफिसमध्येही अर्जुन सर्वांचे मने जिंकताना दिसणार आहे. या सर्व गोंधळात अर्जुन मात्र आपल्या 'करकटक' अंदाजाने आणि सकारात्मक वृत्तीने 'कंपास' मधील म्हणजेच भैवरवीचा सगळा तणाव, भांडणं आणि गैरसमज मिटवण्यासाठी सज्ज आहे. अर्जुन हे कसे करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.