Aai Tuljabhavani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aai Tuljabhavani : जागर स्त्री शक्तीचा, पाहा 'आई तुळजाभवानी' मालिकेचा विशेष भाग

Aai Tuljabhavani Update : 'आई तुळजाभवानी' मालिकेत महिला दिनानिमित्त विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.

Shreya Maskar

'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani ) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आई तुळजाभवानीच्या आगामी भागात देवीच्या सामर्थ्याचा अद्वितीय प्रवास पाहायला मिळणार आहे. देवीच्या शक्ती आणि कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी मालिकेत एक रोमांचक वळण येणार आहे. भवानी शंकर यांच्यासोबत संवाद आणि त्यातून उलगडणारे अलौकिक दैवी रूपे प्रेक्षकांना थक्क करणारी आहेत.

देवीच्या विविध रूपांची महती, तिचं भक्तांवरचे प्रेम आणि राज्याभिषेकाच्या माध्यमातून तिच्या शक्तिपीठाचे अधिकृतपणे प्रतिष्ठापन करण्याचा निर्णय यामुळे या भागात स्त्रीशक्तीचा जागर अनुभवायला मिळणार आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेचा विशेष भाग ८ मार्चला रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

देवीचे जगत जननी रूप, तुळजाभवानीपासून महाकालीपर्यंतचा प्रवास आणि भवानी शंकरांचे मार्गदर्शन या सगळ्यांतून स्त्री शक्तीची अपार ताकद आणि तिचा आदर अधोरेखित होतो. या आगळ्यावेगळ्या भागात देवीचे साम्राज्ञी होण्याचे गूढ आणि त्यामागील कारणे उलगडली जाणार आहेत. देवीच्या राज्याभिषेकासाठी भवानी शंकरांचे वचन आणि त्यामधील श्रद्धा पाहून प्रेक्षक निश्चितच भारावून जाणार आहेत.

आई तुळजाभवानीचा राज्याभिषेक करून घेण्यास नकार आहे. भवानी शंकर तुळजाभवानीला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. तू साक्षात जगत जननी आहेस. आदिशक्ती, पार्वती, त्वरिता, शाकंभरी, महाकाली देखील तूच आहेस. आई तुळजाभवानी राज्याभिषेक करण्यास तयार होणार का? पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT