Raja Shivaji Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji: संगीत दिग्दर्शक गायक अतुल गोगावलेच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी'मध्ये साकारली ही खास भूमिका

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून संगीतकार अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले अभिनयात पदार्पण करत आहे. रितेश देशमुखच्या या ऐतिहासिक चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.

Shruti Vilas Kadam

Raja Shivaji: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल असलेल्या अतुल गोगावलेचा मुलगा आर्य गोगावले अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. आर्यने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्य गोगावले हा प्रसिद्ध संगीतकार अतुल गोगावले यांचा मुलगा असून, संगीत क्षेत्रातील वारसा पुढे नेण्याऐवजी त्याने अभिनयाची वाट निवडली आहे. लहान वयातच त्याने कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने काम करत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यामुळे तो भविष्यात मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात रितेश देशमुख यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील ड्रिम प्रॉजेक्ट असल्याचे बोलले जाते.

चित्रपटात जिनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर यांसारख्या मोठ्या कलाकारांचीही भूमिका आहे. तसेच एका विशेष भूमिकेत सलमान खानही दिसत असल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने सुमारे ११ कोटी रुपयांची कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati rahuri bypolls election results: 21 व्या फेरी नंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ८९ हजार ६५७ मतांची आघाडी

Raja Shivaji : छत्रपती! 'राजा शिवाजी'च नव्हे तर 'या' ५ शिवाजी महाराजांच्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर घातलाय धुमाकूळ

Election Result Live : बहरामपूरमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर

Pune : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील ट्रेन २ दिवस रद्द, नेमकं कारण काय?

Crime News : कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील व्यापारी कुटुंबावर हल्ला, कार अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT